अशोकनगर येथील बोगस डॉक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:25+5:302021-04-29T04:10:25+5:30

पदवी नसताना रुग्णांवर उपचार, दोन दिवसांची पोलीस कोठडी धामणगाव रेल्वे/ तिवसा : कोणतीही पदवी नाही, वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नाही, ...

Bogus doctor arrested in Ashoknagar | अशोकनगर येथील बोगस डॉक्टरला अटक

अशोकनगर येथील बोगस डॉक्टरला अटक

Next

पदवी नसताना रुग्णांवर उपचार, दोन दिवसांची पोलीस कोठडी

धामणगाव रेल्वे/ तिवसा : कोणतीही पदवी नाही, वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नाही, तरीही खुलेआम उपचार करणाऱ्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथील बोगस डॉक्टरला कुऱ्हा पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, दिलीप उद्धवराव खंडारे (५५, रा. अशोकनगर) असे गुन्हा नोंदविण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तेथीलच मंगेश सुलताने (३३) या युवकाचा जिल्हा ग्रामीण रुग्णालयात १८ एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापूर्वी त्याने दिलीप खंडारे याच्याकडे उपचार घेतले होते. त्याने व्यवस्थात उपचार केले नसावे, अशी शंका व्यक्त करीत मृताचे वडील प्रल्हाद सुलताने यांनी २० एप्रिल रोजी कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या अनुषंगाने धामणगाव रेल्वे तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे या डॉक्टरच्या पदवीची कागदपत्रे पडताळणीसाठी पत्र दिले. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकाने घरझडती घेऊन खंडारेकडील औषधी ताब्यात घेतल्या. २५ एप्रिल रोजी अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय अभ्यासक्रमासंबंधी कुठलेही प्रमाणपत्र नसल्याचा व औषधी मुदतबाह्य असल्याचा अहवाल दिला. त्यापूर्वी त्याला त्याच्याकडील प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. तो काहीही सादर करू न शकल्याने २७ एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०४ (अ), कलम ३३, ३६ महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ (ए) अन्वये गुन्हे दाखल करून त्याला अंजनगाव सुर्जी येथून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. या प्रकरणाचा तपास कुऱ्हाचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.

---------------

‘लोकमत’मध्ये बोगस डॉक्टरांविरुद्ध बातमी आली. आम्ही चौकशी केली असता, यात संबंधित डॉक्टर दोषी आढळल्याचे दिसत आहे.

डॉ. हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे

Web Title: Bogus doctor arrested in Ashoknagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.