बोहरा ब्रदर्सने केली अडीच हजार टॅबलेटची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:28 PM2018-06-01T22:28:59+5:302018-06-01T22:29:11+5:30

रायली प्लॉट स्थित दवा बाजारातील बोहरा ब्रदर्सने २ हजार ५०० बनावट गोळ्यांची विविध ठिकाणी विक्री केल्याचे अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. बोहरा ब्रदर्सवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाकरिता कोतवाली पोलीस इंदूरला जाणार आहे.

Bohra Brothers sold two and a half tablets | बोहरा ब्रदर्सने केली अडीच हजार टॅबलेटची विक्री

बोहरा ब्रदर्सने केली अडीच हजार टॅबलेटची विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देबनावट औषधीचे प्रकरण : इंदूरला जाणार कोतवाली पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रायली प्लॉट स्थित दवा बाजारातील बोहरा ब्रदर्सने २ हजार ५०० बनावट गोळ्यांची विविध ठिकाणी विक्री केल्याचे अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. बोहरा ब्रदर्सवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाकरिता कोतवाली पोलीस इंदूरला जाणार आहे.
तेथील इशिता फार्माचे मालक प्रवीण नारायण वर्मा यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे. गुरुवारी अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक चंद्रमणी डांगे यांनी कोतवाली पोलिसांकडे बनावट औषधी विक्रीसंदर्भात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी दवा बाजारातील बोहरा ब्रदर्सचे महेश जयंतीलाल बोहरा, उमेश जयलाल बोहरा, राजेश बोहरा यांच्यासह इंदूरच्या इशिता फार्माचे मालक प्रविण वर्माविरुद्ध फसवणुकीसह औषधी द्रव्य सांैदर्यप्रसाधन अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला. एफडीएने बोहरा ब्रदर्सच्या दुकानातील 'सेफा ओ' नावाच्या अ‍ॅन्टीबायोटिक गोळ्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. तपासणीनंतर त्या टॅब्लेटमध्ये ‘सेफीझिन’ व ‘ओ फॅक्सेझिन’ हे घटक असणे आवश्यक होते. मात्र, त्यात 'पॅरॉसिटॉमाल'चे अंश आढळून आले. पॅरॉसिटॉमाल ही े औषधी तापनिरोधक आहे.
‘सेफा ओ ’मध्ये पॅरासिटामॉल आढळून आल्याने ती औषधी बनावट असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. बोहरा ब्रदर्सने ‘सेफा ओ’ टॅबलेटचे २५ बॉक्स इंदूरच्या इशिता फार्मा येथून ११ हजार ८९३ रुपयांमध्ये खरेदी केले होते. प्रत्येक बॉक्समध्ये दहा स्ट्रीप असून प्रत्येक स्ट्रीपमध्ये दहा गोळ्या अशा २,५०० गोळ्या बोहरा ब्रदर्सने चांदूरबाजार, स्थानिक बालाजी एजन्सी, व लोणीतील माउली मेडिकलला विकल्या. त्यामुळे २० रुपयाला एक याप्रमाणे ‘सेफा ओ’ या गोळ्यांची विक्री करण्यात आली. बनावट औषधींचा पदार्फाश झाल्यानंतर ही संबधित औषधी विक्रेत्यांनी विक्री सुरुच ठेवल्याने ‘सेफा ओ’ टॅबलेटचा माल परत बोलाविता आला नाही. यावरून या गोळ्या अनेक ग्राहकांना विकण्यात आल्याचे निरीक्षण एफडीएने नोंदविले. मात्र, ‘सेफा ओ’चा त्या रुग्णांवर काय प्रभाव पडला असावा, ही बाब उघड होईल तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरात 'सेफा ओ'
‘सेफा ओ’ हे अँटिबायाटिक टॅबलेट मानवी शरीरावर विविध कारणाने होणारे इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरले जाते. डॉक्टर ‘सेफा ओ’ टॅबलेट प्रिस्क्रिशनवर लिहून देतात. त्याद्वारेच मेडिकलमधून ही औषधी विक्री केली जाते. मात्र, बनावट ‘सेफा ओ’ टॅबलेटमध्ये पॅरासिटामॉलचे काही घटक आढळून आले असून, ती इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरणे नियमबाह्य ठरते. एफडीएने घेतलेले ‘सेफा ओ’च्या नमुन्यावर उत्पादन तारीख ८/२०१६ तर एक्सापायरी तारीख जुलै २०१८ आहे. त्यामुळे पुढील महिन्यात त्या गोळ्या कालबाह्य होणार होत्या.

बोहरा ब्रदर्सने इंदूरच्या इषिता फार्मातून २५ बॉक्स ‘सेफा ओ’ टॅब्लेट ११ हजार८९३ रुपयांमध्ये खरेदी केल्याचे देयक उपलब्ध आहे. त्या टॅबलेट जिल्ह्यातील तिन मेडिकलमधून रुग्णांना विक्री करण्यात आल्या. त्यामुळे तो माल परत बोलाविता आला नाही.
- चंद्रमणी डांगे, औषधी निरीक्षक, एफडीए.

Web Title: Bohra Brothers sold two and a half tablets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.