थर्टीफर्स्टपर्यंत एमटीडीसी रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:47+5:302020-12-24T04:13:47+5:30
अमरावती : गतवर्षीपासून ख्रिसमससह नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी घरी बसण्यापेक्षा पर्यटन स्थळी जाऊन धमाल करण्याचा ट्रेंड रुजला आहे. यंदा ...
अमरावती : गतवर्षीपासून ख्रिसमससह नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी घरी बसण्यापेक्षा पर्यटन स्थळी जाऊन धमाल करण्याचा ट्रेंड रुजला आहे. यंदा कोरोनाच्या सावटामुळे पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता वर्तविली जात होती . मात्र ३१ डिसेंबर पर्यंत अर्थात थर्टीफर्स्टपर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चिखलदाऱ्यासह अन्य ठिकाणचे रिसॉर्टचे बुकिंग फूल्ल झाले आहे.
विविध ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओढा वाढवा व त्यामधून शासनालाही फायदा व्हावा या उद्देशाने शासनाने पर्यटन स्थळांच्या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या एमटीडीसी रिसॉर्ट सुरू केले आहेत. याला पर्यटकांची ही पसंती मिळत आहे. मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता. सर्वत्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता.त्यानंतर जुन महिन्यापासून टप्याटप्याने अनलॉक केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.कोरोनामुळे गत पाच महिन्यापासून चिखलदरा येथील पर्यटन महामंडळाचे रिसॉर्ट बंद होते.आता ऑक्टोंबर महिन्यापासून हे रिसाॅर्ट सुरू करण्यात आले आहे. अशातच आता ख्रिसमससह नववर्ष जवळ आले आहे.त्यामुळे पर्यटकांनी आपले आपले बेत सरकारी सुटया पाहून आखले आहेत.त्यानुसार चिखलदरा येथील पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टचे आगाऊ बुकिंग सुरू होताच एमटीडीसीचे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील रिसॉर्ट फूल्ल झाले आहे . याशिवाय अन्य ठिकाणीही असलेल्या रिसॉर्टचे बुकिंग पर्यटकांनी केल्याचे पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी सांगितले त्यामुळे नाताळ पासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यटन स्थळ जगबजणार आहेत.