पोलिसांना हद्दीचा संभ्रम; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:17 AM2021-09-08T04:17:13+5:302021-09-08T04:17:13+5:30

असाइनमेंट अमरावती : सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या त्या भागात एक पोलीस ठाणे आहे. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कुणाच्या हद्दीत ...

Border confusion to police; After the complaint, what is the limit first? | पोलिसांना हद्दीचा संभ्रम; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

पोलिसांना हद्दीचा संभ्रम; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

Next

असाइनमेंट

अमरावती : सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या त्या भागात एक पोलीस ठाणे आहे. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याआधी गुन्हा कुणाच्या हद्दीत घडला, नेमका कुठे घडला, याबाबत विचारणा केली जाते. तो गुन्हा दुसऱ्या ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यास तक्रारदाराला तिकडे पाठविले जाते. शहरातील १० पोलीस ठाण्यांचा परिसर एकमेकांना लागून असल्याने हा संभ्रम निर्माण होतो. मात्र, ग्रामीण भागातील ३१ पोलीस ठाणी दूर अंतरावर आहेत. त्यामुळे हद्द बदल्यास तक्रारकर्त्याला तक्रार नोंदविण्यासाठी दूरचे अंतर गाठावे लागते. एकट्या वरूड तालुक्यात वरूडसह शेंदूरजनाघाट व बेनोडा, चांदूरबाजार तालुक्यात चांदूरबाजारसह शिरजगाव व ब्राह्मणवाडा थडी, भातकुली तालुक्यात भातकुलीसह खोलापूर या ठाण्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे अनेक जणांना या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात येरझारा माराव्या लागतात. प्रत्यक्षात सीआरपीसीच्या कलम १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला, तेथेच गुन्हा दाखल करणे, बंधनकारक आहे. मात्र, अपवादात्मक स्थितीत काही ठिकाणी तसे होताना दिसत नाही.

////////////

जिल्ह्यातील पोलीस ठाणी ३१

पोलीस अधिकारी :

पोलीस कर्मचारी :

/////////////

तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई

१) जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्याच्या हद्दी एकमेकांशी संलग्न आहेत. तशी फलकेदेखील लावण्यात आली आहेत.

२) हद्द कुठलीही असो, तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी दिले आहेत.

३) शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीची देखील सरमिसळ आहे. अनेक प्रकरणात राजापेठ, फ्रेजरपुरा की बडनेरा असा संभ्रम निर्माण होतो.

४) तक्रार दाखल करून न घेतल्यास, तशी तक्रार एसपी किंवा सीपींकडे केल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई केली जाते.

///////////////

ही घ्या उदाहरणे

१) गावे दुसऱ्याच पोलीस ठाण्यात

पूर्वी भातकुली तालुक्यातील अनेक गावे खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत होती. भातकुली ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर ती गावे भातकुली पोलीस ठाण्याशी संलग्न करण्यात आली. त्यामुळे आजही अनेक लोक खोलापूर पोलीस ठाण्यात धाव घेतात.

////////////

लगतची तीन गावे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात

भातकुली तालुक्यातील कुंड सर्जापूर, खारतळेगाव व अळणगाव ही तीनही गावे एकमेकांशेजारी आहेत. मात्र, अळणगाव भातकुलीत, कुंड सर्जापर नागपुरीगेटमध्ये तर खारतळेगाव वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे पोलिसांसोबतच तक्रारकत्यांसमोरदेखील हद्दीचा प्रश्न निर्माण होतो.

////////////////

हद्दीचा संभ्रम

अंजनसिंगी हे गाव धामणगाव रेल्वे तालुक्यात आहे. तर ते गाव तिवसा तालुक्यातील कुर्हा या पोलीस ठाण्याशी संलग्न आहे. त्यामुळे कुर्हा पोलीस ठाण्यात गेल्यास तक्रार नोंदवून घेण्यापूर्वी घटनास्थळाची विचारणा केली जाते.

///////////

कोट

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या सीमा एकमेकांशी संलग्न आहेत. पोलीस ठाण्याची हद्द दर्शविणारे फलकदेखील लावण्यात आले आहे. तक्रारकर्त्याला घटनास्थळाची विचारणा केली जाते. मात्र, हद्द कुठलीही असो, तक्रार नोंदविण्याचे निर्देश आहेत.

-विक्रम साळी,

पोलीस उपायुक्त, अमरावती

/////////////

Web Title: Border confusion to police; After the complaint, what is the limit first?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.