बोरगाव निस्ताने ग्रामपंचायत ठरली ओडीएफ प्लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:38+5:302021-08-21T04:16:38+5:30
धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने ही ग्रामपंचायत हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) म्हणून घोषित झाली असून, तालुक्यातील या ग्रामपंचायतीला ...
धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने ही ग्रामपंचायत हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) म्हणून घोषित झाली असून, तालुक्यातील या ग्रामपंचायतीला पहिला बहुमान मिळाला आहे
धामणगाव तालुक्यातील ९४० लोकसंख्या असलेल्या बोरगाव निस्ताने या गावातील सरपंच मनीषा विशाल रोकडे यांनी गावात विविध उपक्रम राबविले हे गाव पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेत दूर होते. आपल्या गावात अधिक विकासात्मक कामे व्हावीत म्हणून या ग्रामपंचायतीने हागणदारीमुक्त गाव व स्वच्छता अभियान हाती घेतले. ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीने उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाला ग्रामस्थांनीही मोलाची साथ दिली. हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मध्ये वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याचा वापर करणे, त्याची शाश्वती राखणे, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाळा, अंगणवाडी तसेच सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, गाव स्वच्छ ठेवणे आदी कामे करण्यात येत आहेत. गटविकास अधिकारी माया वानखडे, विस्तार अधिकारी किशोर चव्हाण, मिलिंद ठुनुकले, येथील सरपंच मनीषा विशाल रोकडे, उपसरपंच नितीन कांबळे, ग्रामसेवक व्ही. एस. दुर्योधन यांच्यासोबतच ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.