बॅग लिफ्टींगप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:16+5:302021-06-25T04:11:16+5:30

अमरावती : बॅग लिफ्टींग करून लाखो रुपये चोरणाऱ्या दोन बॅग लिफ्टरला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रुपेश ऊर्फ ...

Both arrested in bag lifting case | बॅग लिफ्टींगप्रकरणी दोघांना अटक

बॅग लिफ्टींगप्रकरणी दोघांना अटक

Next

अमरावती : बॅग लिफ्टींग करून लाखो रुपये चोरणाऱ्या दोन बॅग लिफ्टरला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रुपेश ऊर्फ बंटी राजेश चव्हाण (२५ रा. अमरावती) व विशाल दीपक खराळे (२६ रा. मोर्शी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी नांदगाव पेठ हद्दीतील दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

२०१८ मध्ये नांदगाव पेठ येथील रिलायन्स पेट्रोल पंपामधील लाखो रुपयांची रोख डिलेव्हरी कंपनीमार्फत बँकेत जमा करण्यात येत होती. त्यावेळी आरोपींनी पाळत ठेवून पेट्रोलपंपाच्या प्रतिनिधीला रस्त्यात अडविले. त्याच्याजवळील १२ लाख ९२ हजाराची रोख जबरीने हिसकावून नेली होती. त्याचप्रमाणे वाईल्ड ग्लोरी हॉटेलसमोरून आरोपींनी एका व्यक्तीजवळील ४ लाख ५३ हजाराची रोख जबरीने हिसकावून नेली होती. या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, दोन्ही आरोपींना नांदगाव पेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Both arrested in bag lifting case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.