बीपीएल यादीत घोळ; मंत्रालयात बैठक
By Admin | Published: March 29, 2015 12:25 AM2015-03-29T00:25:05+5:302015-03-29T00:25:05+5:30
राज्य शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या बीपीएल यादीतून अमरावती शहरातील १४ हजार लाभार्थ्यांची नावे अपात्र ठरविल्याच्या...
अमरावती : राज्य शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या बीपीएल यादीतून अमरावती शहरातील १४ हजार लाभार्थ्यांची नावे अपात्र ठरविल्याच्या पार्श्वभूमिवर विधीमंडळ अधिवेशनाच्या काळातच बीपीएल यादीतील घोळ दूर करण्यासाठी बैठक होत असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
ना. पोटे हे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शनिवारी ते शासकीय विश्रामभवनात अभ्यागताच्या भेटीगाठी घेत असताना बीपीएल यादीतून पात्र लाभार्थ्यांना डावल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे नगरसेवक प्रदीप दंदे यांनी बीपीएल यादीत समाविष्टसाठी शासनाने जे निकष लावले, त्यात गॅस सिलिंडर, मोबाईल, आलमारी, शौचालय, स्लॅबचे घर असल्यास त्यांना बीपीएलमध्ये सामील करता येणार नाही. मात्र, हल्ली १२ हजार बीपीएल लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली.