धारणीत गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन

By admin | Published: February 21, 2016 12:13 AM2016-02-21T00:13:59+5:302016-02-21T00:13:59+5:30

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतानासुध्दा धारणी शहर याला अपवाद ठरले आहे.

Breach of cow protection ban | धारणीत गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन

धारणीत गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन

Next

धारणी : महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतानासुध्दा धारणी शहर याला अपवाद ठरले आहे. येथील मेळघाट टॉकीज ते कोंडवाडा मार्ग तसेच दुबई मोहल्ला भागात रोज गाई व बैलांची अवैध कत्तल करून मांसाची विक्री केले जाते. यासाठी अवैध कत्तलखाना छुप्या मार्गाने तयार करण्यात आला आहे.
अवैध कत्तलखान्यासाठी गोवंशाची खरेदी शनिवारी बैलबाजाराच्या माध्यमातून होते. या खरेदी केलेल्या गाई व बैलांना ठराविक जागेत बांधून ठेवण्यात येते. मध्यरात्री २ ते ५ वाजतादरम्यान या गोधनाची क्रूरपणे कत्तल करून त्यांचे मांस आॅर्डरप्रमाणे पाठविले जाते. त्यामुळे सकाळ उजडण्यापूर्वी हा अवैध व्यवसाय गुंडाळण्यात येतो. या व्यवसायात अत्यंत गुप्तता पाळली जाते. कोणत्याही नवीन ग्राहकास गोमांसची विक्री करण्याचे कटाक्षाने टाळले जाते.
या अवैध कत्तलीची माहिती पोलिसांना असतानाही ते याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत आहेत. गोवंशप्रेमींनी सूचना दिल्यास त्यावर कारवाई करण्याचेही टाळतात. त्यामुळे पोलिसांना सूचना देऊनही कारवाई होत नसल्याने गोवंशप्रेमींमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. थेट कारवाई करण्याचे अधिकार केवळ पोलिसांनाच असल्याने हिंदुत्ववादी संघटना हतबल झाल्या आहेत.

Web Title: Breach of cow protection ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.