‘ब्रेक द चेन’ने उपासमारीची आली वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:53+5:302021-04-19T04:11:53+5:30
एक तर सगळेच बंद करा, नाहीतर सर्व सुरु करा; व्यापाºयांचा संताप चांदूर बाजार : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ...
एक तर सगळेच बंद करा, नाहीतर सर्व सुरु करा; व्यापाºयांचा संताप
चांदूर बाजार : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवा, असे निर्देश दिले आहेत. तालुक्यात या निर्णयावर व्यापाऱ्यांनी प्रचंड नाराजी दर्शविली. आवश्यक सेवेच्या नावावर इतरही अनेक व्यवसाय सर्रास सुरू असल्याने शासनाने एकदा काय असेल तर निर्णय घ्यावा. एक तर सगळेच बंद करा नाहीतर सगळे सुरू तरी ठेवा, अशा संतापजनक प्रतिक्रिया ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांकडून येऊ लागल्या आहेत.
गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णत: लॉकडाऊनमुळे शहरी व ग्रामीण भागातील दुकानदारांचा कणा मोडला. आता पुन्हा सरकारने ब्रेक द चेनमध्ये केवळ अत्यावश्यक दुकानांना व सेवांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, या ब्रेक द चेनमध्ये तालुक्यातील अनेक व्यवसाय संचारबंदीत सर्रास सुरू आहे. मात्र, शासनादेशानुसार मुभा देण्यात आलेल्या व्यावसायिकांनी सर्रास शासन नियमांचे धिंडवडे उडविले आहे. शहरातील रस्त्यालगत असलेले फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते कोणत्याच प्रकारचे मास्क लावत नसून राजरोसपणे व्यवसाय करीत आहे. खासगी वाहने भरभरून नागरिकांची वाहतूक करीत आहे. कृषी साहित्य विक्रीस्या नावावर हार्डवेअरची दुकाने, चस्मे विक्रीची दुकाने, सर्रास सुरू आहे. हॉटेलमध्ये नास्ता, जेवण पार्सल सुविधा देण्याचे आदेश असताना हॉटेलमध्ये सर्रास या आदेशाला तिलांजली दिली जात आहे. बँकांमध्ये मोठी गर्दी असताना बँक प्रशासन मात्र कोणत्याच उपाययोजना करताना दिसत नाही. शीतपेयाच्या दुकानांत तसेच निंबु सरबतस्या गाड्या मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत. त्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे. अशा नियमबाह्य दुकानदारांना शासनातर्फे व्यवसायाला मुभा देण्यात येत असून, इतर दुकांदारांवर निर्बंध घालण्यात आल्यामुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीस आला आहे.
बॉक्स
नियंत्रण पथके बेपत्ता, प्रशासन बेवचक
सततण्या लॉकडाऊनमुळे व्यवसायाच्या ठिकाणची जागा भाडे, बँकेचे हप्ते, कामगारांचे वेतन तर घर खर्चाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी अनेक व्यावसायिक मानसिक तणावाखाली आले आहेत. ग्रामीण भागात हातभट्टी दारू, देशी दारू, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक आणि अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून, यावर कारवाई होणे गरजेचे झाले आहे. मंगलकार्यालयात लग्नसमारंभांना २५ लोकांची परवानगी दिलेली आहे. मात्र, हे लग्न रद्द होऊन घरोघरी मोठमोठी लग्न समारंभ होत आहे. यावर तालुका प्रशासनाचा कोणताच वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. ज्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली ते दुकानदार शासन नियमांचे पालन करीत नसतानाही त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही. मग शासनाचे नियम उर्वरित दुकांदारांनाच का? कोरोनाचा प्रादुर्भाव हा बंद ठेवण्यात आलेल्या व्यावसायिकांमुळेच होतोय काय, असा सवाल नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे.
--------------------------------