आचारसंहितेमुळे कामांना ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:28 PM2018-05-04T23:28:40+5:302018-05-04T23:28:58+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता २० एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर काही विभागांतून होणाºया कामांना ब्रेक लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता २० एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर काही विभागांतून होणाºया कामांना ब्रेक लागला आहे. ग्रामीण भागातून विविध कामे घेऊन लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात येत आहेत. मात्र, अधिकारी आचारसंहितेची अडचण पुढे करीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अमरावती मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. २१ मे रोजी मतदान, तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडेल व सत्ताधाºयांच्या पथ्यावर पडेल अशा कामांना २४ मेपर्यंत ब्रेक लागला आहे. आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच यांच्यासह इतरांनी मंजूर करून आणलेल्या योजना, विकास योजना, जिल्हा परिषद व मंत्रालयातील कामेही थांबली आहेत. सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असल्याने विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी जोरदार प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत सुरू असलेली कामे तूर्तास थांबवावी लागली आहेत.
नागरिकांच्या कार्यालयांमध्ये वाढल्या चकरा
आचारसंहिता सुरू असली तरी महत्त्वाची कामे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर कामे करण्यात मात्र नियमांची अडचण आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल अशी कामे करू नयेत, अशा सूचना जिल्हा परिषदेने विभागप्रमुखांना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, नागरिक जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती खेटे घालताहेत. अधिकारी आचारसंहितेक डे बोट दाखवीत आहेत.