माळी समाज शाखा तोडो, समाज जोडो यासाठी साथ द्या; माळी समाज ऋणानुबंध महसंमेलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 07:16 PM2020-01-05T19:16:08+5:302020-01-05T19:16:12+5:30

२४ वे राज्यस्तरीय माळी समाज ऋणानुबंध महसंमेलन 

Break the gardener community branch, support the community; Gardener Society Debt Convention | माळी समाज शाखा तोडो, समाज जोडो यासाठी साथ द्या; माळी समाज ऋणानुबंध महसंमेलन 

माळी समाज शाखा तोडो, समाज जोडो यासाठी साथ द्या; माळी समाज ऋणानुबंध महसंमेलन 

Next

अमरावती : स्थानिक सर्वशाखीय माळी समाज महासंघाच्यावतीने २४ वे राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महासंमेलन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे रविवारी पार पडले. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संयोजक श्रीकृष्ण बनसोड यांनी प्रास्ताविकातून २३ वर्षांपासूनचा आढावा घेत माळी समाजातील प्रत्येकाने शाखा तोडो, समाज जोडो, असे आवाहन केले. 

गणेश खारकर हे अध्यक्षस्थानी, तर बबनराव पाटील कार्यस्थिस होते. अधीक्षक अभियंता प्रदीप खवले हे उद्घाटक, तर युवा उद्योजक नंदकिशोर वाठ हे स्वागताध्यक्ष होते. प्रमुख अतिथी राजेंद्र वाठोडकर, अभियंता राजेंद्र आंडे, प्रमोद वासनकर, ओमप्रकाश अंबाडकर, अशोक लहाने (मुंबई), संतोष उषे, अशोक दहीकर, भारतराव खासबागे सुनील कळसकर, अण्णासाहेब आठाकर, भाऊसाहेब पेठे, नगरसेविका वंदना   प्रदीप मडघे, नगरसेविका सुनीता मनोज भेले, नगराध्यक्षा मेघना मडघे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी तीन हजार विवाहहेतुकांची माहिती असलेल्या ऋणानुबंधचे लोकार्पण करण्यात आले. उपस्थितांपैकी ३५१ विवाहहेतुकांनी परिचय दिला. यावेळी अशोक भोगे, गजानन चांदुरकर, दिलीप घोंगडे, अनिल भगत, नीलेश दिनबंधू काळे, सुधाकर अडोकर, प्रशांत वासनकर, गोवर्धन मेंढे रामकृष्ण वाढ, राजेश जावरकर, जयेंद्र पवार, ज्ञानेश्वर मालखेडे, विक्रांत होले, शंकराव फुटाने, अतुल भिरडे, अरूण गणोरकर, सुखदेव मसने, रमेशराव अंबाडकर, सुरेश खेरडे, अशोक खारोने, अ‍ॅड़  भैरवी टेकडे, सुनील डेहनकर, महेंद्र ह्या सेवाभावी संघटकांना महात्मा फुले समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महामेळावाला महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान राज्यातील पाच हजारचे वर समाज बांधव उपस्थित होते. अस्मिता सागर बनसोड, जयश्री प्रकाश कुबडे, स्मिता संजय घाटोळे यांनी संचालन केले. एन आर. ऐले. साहेबराव निमकर, रामकुमार खैरे, नरेंद्र पाचघरे, वसंतराव भडके, मधुकर आखरे, बाळाभाऊ मठा, रामचरण माने, राजेश सावरकर, डी.एस. यवतकर, नंदा बनसोड, हर्षा होले, मेघा निमकर, पो.पा. कविता पाचघरेसह आदींनी पथक परिश्रम घेतले.

Web Title: Break the gardener community branch, support the community; Gardener Society Debt Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.