महसूलच्या बदल्यांना यंदाही ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:59+5:302021-04-24T04:12:59+5:30

एप्रिलपासून शासकीय विभागात बदल्यांचे वारे वाहू लागतात. मनासारखी पोस्टिंग मिळवण्यासाठी मुख्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत मग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चकरा सुरू ...

Break of revenue transfers this year too? | महसूलच्या बदल्यांना यंदाही ब्रेक?

महसूलच्या बदल्यांना यंदाही ब्रेक?

Next

एप्रिलपासून शासकीय विभागात बदल्यांचे वारे वाहू लागतात. मनासारखी पोस्टिंग मिळवण्यासाठी मुख्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत मग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चकरा सुरू होतात. परंतु यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाकडून बदल्यांवर निर्बंध आणले जाऊ शकतात. परिणामी बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्यांचा हिरमोड होऊ शकतो. वास्तविक महसूल विभागात एकाच पदावर तीन किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे संबंधिताना आता बदलीचे वेध लागले आहे. त्याचवेळी बाहेर जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांना पुन्हा गृह जिल्ह्यात परतण्याची उत्सुकता लागली आहे. पण संकटाच्या काळात अनेक अधिकाऱ्यांवर विविध जबाबदारी सोपविण्यात आले आहे. त्यामुळेच बदल्यांवरून आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा लागली आहे.

बॉक्स

गतवर्षी मर्यादित बदल्या

गतवर्षी कोरोनामुळे शासनाने बदलीवर बंधने आणली. केवळ वैद्यकीय कारणांनी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी महसूल विभागातील काही मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.

Web Title: Break of revenue transfers this year too?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.