घरात घुसून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:42+5:302021-05-25T04:13:42+5:30

अमरावती: महिला घरात एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिचा विनयभंग केला. त्यानंतर लाथाबुक्क्याने मारहाण करून तिला जीवे मारण्याची धमकी ...

Breaking into a house and molesting a woman | घरात घुसून महिलेचा विनयभंग

घरात घुसून महिलेचा विनयभंग

Next

अमरावती: महिला घरात एकटी असताना आरोपीने घरात घुसून तिचा विनयभंग केला. त्यानंतर लाथाबुक्क्याने मारहाण करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना नांदगावपेठ ठाणे हद्दीतील डेबुजी नगर रहाटगाव येथे १६ मे रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध २३ मे रोजी गुन्हा नोंदविला आहे.

पोलीस सूत्रानुसार, पंकज दिलीप हिवराळे (४५, रा. डेबुजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात नांदगावपेठ पोलिसात एका महिलेने तक्रार नोंदविली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चाकू घेऊन महिलेवर धावला, महिलेने कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर तिला उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिने उशिरा तक्रार नोंदविली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४,४५२,३२३,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास एपीआय कविता पाटील करीत आहेत.

Web Title: Breaking into a house and molesting a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.