७० गावांना जोडणारा पूल अखेर ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:31+5:302021-06-06T04:10:31+5:30

फोटो पी ०५ सापन लोकमत इम्पॅक्ट सापन नदीपात्रातून आता प्रवास बंद, पुलावरून वाहतूक सुरू नरेंद्र जावरे परतवाडा : ...

Bridge connecting 70 villages finally 'unlocked' | ७० गावांना जोडणारा पूल अखेर ‘अनलॉक’

७० गावांना जोडणारा पूल अखेर ‘अनलॉक’

Next

फोटो पी ०५ सापन लोकमत इम्पॅक्ट

सापन नदीपात्रातून आता प्रवास बंद, पुलावरून वाहतूक सुरू

नरेंद्र जावरे

परतवाडा : वर्षभरापासून अर्धवट कामामुळे लॉकडाऊन झालेला परतवाडा-चिखलदरा मार्गातील धोतरखेडानजीक सापन नदीवरील नवीन पूल ‘लोकमत’च्या वृत्तानंतर गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या मार्गावरील जवळपास ७० गावांतील नागरिकांचा प्रवास सुरळीत झाला आहे. यासंदर्भात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी पाठपुरावा केला होता.

परिसरातून वाहणाऱ्या सापन नदीवरील जुना दोनशे मीटर लांब पूल गतवर्षी तोडल्याने वर्षभरापासून नागरिकांचा नदीपात्रातून प्रवास सुरू होता. नवीन पुलाचे काम अर्धवट झाल्याने पावसाळ्याच्या दिवसांत ७० गावांचा संपर्क तुटणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल व सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली. संबंधित कंत्राटदाराकडून तात्काळ अर्धवट असलेले काम पूर्ण करून घेतले. परिणामी गुरुवारपासून हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

बॉक्स

सतराशे विघ्न, कसा होणार विकास?

परतवाडा-चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली. शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत १३० कोटी रुपये खर्चाच्या या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटींपुढे महामार्ग चौपदरीकरण न होता, केवळ नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह आदिवासी विकासासाठी किमान या रस्त्यांसाठी सूट देण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

अखेर एकदाचा झाला पूल

एक वर्षापासून अर्धवट असलेल्या सापन नदीपात्रातील पुलासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. नागरिकांची होत असलेली वाताहत व पावसाळ्याच्या दिवसांत होणारे परिणाम पाहता, तात्काळ नेमलेल्या कंत्राटदाराकडून विभागात कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, चिखलदरा उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी काम पूर्ण करून घेतले.

Web Title: Bridge connecting 70 villages finally 'unlocked'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.