संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:47+5:302021-01-21T04:12:47+5:30
------------------------------- भरधाव ऑटोरिक्षाची दुचाकीला धडक दर्यापूर : भरधाव ऑटोरिक्षाने दुचाकीला समोरून कट मारल्याने त्यावरील स्वार जखमी झाल्याची घटना मंगळवारी ...
-------------------------------
भरधाव ऑटोरिक्षाची दुचाकीला धडक
दर्यापूर : भरधाव ऑटोरिक्षाने दुचाकीला समोरून कट मारल्याने त्यावरील स्वार जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री बनोसा येथे घडली. शहजाद खान अहमद खान (२६, रा. कासदेपुरा) यांच्या तक्रारीवरून ऑटोरिक्षा (एमएच २७ पी २४३१) चालकाविरुद्ध दर्यापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------------------
लाकडी काठीने डोक्यावर वार
वरूड : मद्यपीने घरासमोर शिवीगाळ करीत लाकडी काठीने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी मिरची प्लॉट येथे घडली. फिर्यादी रवि रामा धुर्वे (२५) यांच्या तक्रारीवरून वरू़ड पोलिसांनी बाबूलाल तुमडामविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------------------------
भरधाव वाहनाची वृद्धाला धडक
मोर्शी : भरधाव दुचाकीने पादचारी वृद्धाला धडक देऊन जखमी केल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली. उमेश दादाराव भुते (३१, रा. हिवरखेड) यांच्या तक्रारीवरून दुचाकी (एमएच २७ एएन-६४०४) धारकाविरुद्ध मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------------------------
माहेरहून पाच लाख आणण्याचा तगादा
दर्यापूर : प्लॉट घेण्याकरिता माहेरहून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावत शिवीगाळ, मारहाण केल्याच्या महिलेच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. संदीप रामचंद्र बाळबुद्धे (४२), हर्षल अनिल बनकर व एक महिला (सर्व रा. वडगाव बु.) यांचा यात समावेश आहे.
------------------------------
दानपेटी फोडली १२ हजार लंपास
ब्राह्मणवाडा थडी : दर्यापूर तालुक्यातील ग्राम खडका येथील दादाजी दरबार येथील गर्भगृहातील दानपेटी फोडून आतील १२ हजार रुपये लंपास केल्याची घटना १६ जानेवारीला घडली. सुभाष गावंडे (रा. खडका) यांच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदविला.
------------------------------
क्षुल्लक कारणावरून इसमाला मारहाण
अमरावती : मद्यपीने क्षुल्लक कारणावरून पित्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिहिदा येथे २९ डिसेंबर रोजी घडली. रामदास राजेराम आमझरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १९ जानेवारी रोजी पवन रामदास आमझरे (२३) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------------------
माहेरहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा
अंजनसिंगी : वाहन घेण्याकरिता माहेरहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावून मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. धीरज रंगराव भालेराव, इंदिरा रंगराव भालेराव, रंगराव गणपतराव भालेराव अशी आरोपींची नावे आहेत.