संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:04+5:302021-03-22T04:13:04+5:30
मांजरखेड कसबा : परिसरात रात्री ७ ते ८ च्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळल्याने मांजरखेड, बासलापूर, चिरोडी ...
मांजरखेड कसबा : परिसरात रात्री ७ ते ८ च्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळल्याने मांजरखेड, बासलापूर, चिरोडी गहू, चणा आदी पिकांना नुकसान झाले आहे. त्यासोबत वीजपुरवठा खंडित होऊन ही गावे रात्रभर अंधारात होती. वेगवान वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीज तारा ट्रीप झाल्या. त्यांची दुरुस्ती महावितरण कर्मचारी करीत आहेत.
----------
निधन वार्ता
नामदेवराव अंबाडकर
फोटो - मेलवर
गुरुकुंज मोझरी : तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील रहिवासी नामदेवराव तानुजी अंबाडकर (९०) यांचे २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, तीन मुली व बराच आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होतील.
---------
विजांच्या कडकडाटात जागल होणार कशी?
अंजनसिंगी : विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शिवारातील वातावरण अनिश्चित झाले आहे. त्यामुळे जीव वाचवायचा की शेतात कापणीला आलेले धान्य चोरांपासून वाचवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. अलीकडे शिवारात शेतमाल चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत.
--------------
पोहरा परिसरात बिबट्याची दहशत
पोहरा बंदी : पोहरा, चिरोडी वनवर्तुळालगतच्या गावांमध्ये बिबट्यांनी शिरकाव केला असून, आतापर्यंत काही शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरे फस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे पोहरा परिसरात बिबट्याची दहशत वाढीस लागली आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
-------------
पूजेची फुले अंबा नाल्यात
अमरावती : विज्ञानाच्या प्रगतीमुळे देव-दानवाची संकल्पना काळाच्या कसोटीवर जोखण्याची वेळ आली असतानाही शहरवासी मात्र देवाला वाहिलेली फुले व इतर साहित्य याची योग्य विल्हेवाट न लावता थेट अंबा नाल्यात फेकतात. यामुळे जलप्रदूषणाची पातळी वाढली आहे.
--------------
रुक्मिणीनगर भागात पार्किंग कारवाई केव्हा?
अमरावती : वाहतूक शाखेकडून रस्त्यावर लागणाऱ्या गाड्या वाहनात कोंबून मुख्यालयात आणल्या जातात. ही कारवाई रुक्मिणीनगर भागात केली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे. सकाळी १२ पर्यंत आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत येथील प्रत्येक दुकानापुढे रस्त्यावर वाहन लागते.