संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:26+5:302021-03-24T04:13:26+5:30

(फोटो आहे) अमरावती : येथील चिलम धावणी मार्गावर एका खुल्या जागेवर सांडपाण्याचे डबके, कचरा साचलेला आहे. त्यामुळे या भागात ...

Brief | संक्षिप्त

संक्षिप्त

Next

(फोटो आहे)

अमरावती : येथील चिलम धावणी मार्गावर एका खुल्या जागेवर सांडपाण्याचे डबके, कचरा साचलेला आहे. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाण्याच्या डबक्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

-----------------

अकोला मार्गावर रस्त्यावर खड्डे

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावर बडनेरा ते लोणी या दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहेत.

अशातच रस्ते चौपदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना रस्ता शोधत पुढे जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून खड्डे पडले असताना डागडुजी केली जात नाही, अशी ओरड आहे.

------------------------------

अंबा नाल्यात कचऱ्याची समस्या

अमरावती : अंबा नाल्याच्या काठावरील रहिवासी नागरिक नाल्यातच कचरा टाकत असल्यामुळे काही ठिकाणी नाल्यात कचरा तुंबत आहे. सफाई कर्मचारी अंबा नाल्यातून कचरा गोळा करीत नाहीत. त्यामुळे नाल्यात कचरा तशाच पडून राहतो. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

------------------------

बडनेरा येथील स्मशानभूमीत अस्वच्छता

अमरावती : अकोला मार्गावरील हिंदू स्मशानभूमीत अस्वच्छता कायम असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमीची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------------

भुतेश्वर येथील दवाखान्यात लसीकरण सुरू करा (फोटो आहे)

अमरावती : स्थानिक भुतेश्वर चौकातील महापालिका दवाखान्यात ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण सुरू करावे, अशी मागणी माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी केली. वैद्यकीय अधिकारी विशाल काळे यांना निवेदन सादर करण्यात आले.

Web Title: Brief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.