थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:47+5:302020-12-03T04:23:47+5:30
अमरावती : शेगाव नाका ते गाडेगनगरपर्यंतच्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप ...
अमरावती : शेगाव नाका ते गाडेगनगरपर्यंतच्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
.........................................
भारनियमनाने नागरिक त्रस्त
अमरावती : ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून कृषी पंपाला नियमित वीजपुरवठा मिळत नसताना अशातच अवेळी खंडीत होणारा वीजपुरवठा तसेच भारनियमनामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
.................................................................
कुष्ठरोग, क्षयरोग्य रुग्णाची शोधमोहीम
अमरावती : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व कुष्ठरोग निर्मूलनांतर्गत जिल्ह्यात १ ते १६ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याहस्ते मंगळवारी प्रारंभ करण्यात आला.
.........................................
वीजबिलाविरोधात व्हीआरएएसचे आंदोलन
अमरावती : कोरोना काळातील वीजबिल माफ करण्याच्या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती (व्हीआरएस) द्वारा ७ डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या अंतर्गत नुकत्याच झालेल्या जिल्ह्याच्या समीक्षा बैठकीत जिल्हा मुख्यालय स्तरावर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
.............................................
मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या
अमरावती : कठोरा नाका ते पोटे टाऊनशिपकडे जाणाऱ्या मुख्य रहदारीच्या मार्गावर मोकाट जनावराचा ठिय्या बसत आहेत. वाहतुकीस खोंळबा निर्माण होत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.