थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:13 AM2020-12-24T04:13:53+5:302020-12-24T04:13:53+5:30
अमरावती : शहरातील ऑटोत दिवसेंदिवस प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक बसविले जात आहे. परिणामी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत ...
अमरावती : शहरातील ऑटोत दिवसेंदिवस प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक बसविले जात आहे. परिणामी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. शिवाय नियामाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित ऑटोचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी होत आहे.
.................................................................................................
वाटाण्याच्या शेंगाची आवक वाढली
अमरावती : बाजारपेठेत भाजी विक्रेत्याकडे वाटाणे शेंगाची मोठी आवक वाढत आहे. त्यामुळे शहरातील विविध मार्गावर भाजी विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्यांकडे ग्राहकही आवडीने वाटाण्याच्या शेंगा खरेदी करताना दिसत आहे. प्रतिकिलो ४० रुपये दराने त्यांची विक्री होत आहे.
...................................................
पौराणिक ज्ञानग्रहण संस्कार शिबिर
अमरावती : कोरोना जागतिक संकटामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणी शांता व संयमाने मात करण्यासाठी मन शांत करणे आवश्यक आहे. हिमालयातील आठशे वर्षे जुने ध्यान शिकविण्यासाठी २३ ते ३० डिसेंबर दरम्यान ऑनलाइन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवकृपानंद स्वामी समाज माध्यम आवरून शिबिरात सहभागी होणाऱ्या साधकांना मार्गदर्शन करणार आहे.
...................
स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत रांगोळी स्पर्धा
अमरावती : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत भाजी बाजार येथील गटनेते अब्दुल नाझीम अब्दुल रफिक यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत भाजीबाजार जून मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दहा महिला व मुलींनी स्वच्छतेवर आधारित रांगोळ्या रेखाटल्या या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
..................
प्रशांत नगरातील वनराई रस्ता दुरुस्तीची मागणी
अमरावती: प्रशांत नगर येथील वनराई मार गल्ली नंबर १ येथे भुयारी गटार योजना अंतर्गत रस्ता खोदून, पाईप टाकण्यात आले होते. काम झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने रस्ता थातूरमातूर दुरुस्त केला. सहा महिन्यांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्याने पायी चालणेसुद्धा कठीण होऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
..........................
बडनेरा येथे दत्तजयंती उत्सव
अमरावती: बडनेरा येथे संत हरीबाबा संस्थान दत्त मंदिर येथे २३ ते ३० डिसेंबर दरम्यान दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे २३ डिसेंबर पासून कथावाचक कैलास महाराज लोखंडे यांचे भागवत महापुराण होणार असून दत्तोपासक अरविंद वऱ्हेकर हे गुरुचरित्राचे पारायण करतील दररोज माणिक काळे व राधा कृष्ण भजन मंडळाचे भजन याशिवाय अन्य धार्मिक कार्यक्रम सुध्दा होणार आहे. २९ ला कैलास महाराज लोखंडे यांच्या हस्ते श्री दत्त जन्माचे किर्तन 30 ला सकाळी आठ वाजता पालखी सोहळा तर याच दिवशी गोपाळकाला कार्यक्रम होईल भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अरविंद वऱ्हेकर यांनी केले आहे
.................................................
जुन्या पेन्शनबाबत सभा
अमरावती : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा शाखेचा जिल्ह्यातील सर्व पेन्शन फायटर तसेच पदाधिकाऱ्यांची या विषयावर चर्चा करण्यासाठी तालुकानिहाय सभा आयोजित केल्या आहेत. २४ डिसेंबर रोजी नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती सभागृहात सभा होणार आहे. सभेला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
...........................................
कोरोना लसीकरणाचे नियोजन
अमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी लवकरच शासनाकडून लस उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नियोजन करण्यात येत आहे. याकरिता आरोग्य विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे.
......................................