थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:11 AM2021-01-02T04:11:57+5:302021-01-02T04:11:57+5:30

अमरावती : जिल्हा परिषदेकडून सन २०१९-२० चे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अद्याप वितरित करण्यात आलेले नाहीत. सदर ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

Next

अमरावती : जिल्हा परिषदेकडून सन २०१९-२० चे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अद्याप वितरित करण्यात आलेले नाहीत. सदर पुरस्कार ३ जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती व अखिल भारतीय माळी महासंघाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांरकडे केली आहे.

.....................................

व्हीएमव्ही मार्गावरील पथदिवे बंद

अमरावती : शहरातील अतिशय वर्दळीच्या शेगाव नाका ते व्हीएमव्ही मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्री बंद असतात. त्यामुळे या मार्गावर अंधाराचे साम्राज्य असते. या मार्गावरील बंद असलेले पथदिवे नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.

...................................

शासकीय कार्यालयांना दोन दिवस टाळे

अमरावती : जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय कार्यालयांना शनिवार व त्याला लागूनच रविवारची सुटी असल्याने दोन दिवस सरकारी कार्यालयांना टाळे राहणार आहेत. ४ जानेवारीला शासकीय कार्यालये उघडतील. तोपर्यंत नागरिकांची कामे ठप्प राहतील.

..................................................

कृषिपंपाला अखंडित वीजपुरवठा करा

अमरावती : ग्रामीण भागात सध्या रबी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकांची पेरणी केली आहे. त्यामुळे या पिकांना पाणी देणे महत्त्वाचे आहे. अशातच महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याने वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता, कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

.............................................

युवा सेनेतर्फे निराधारांना ब्लँकेट वाटप

अमरावती : नवीन वर्षाचे औचित्य साधून शहरातील निराधारांना सामाजिक बांधीलकी जोपासत युवा सेनेच्यावतीने शहरात अनेक निराधारांना कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी बॅकेट वाटप करण्यात आले. उपक्रमात युवा सेनेचे पदाधिकारी व युवा सैनिक सहभागी झाले होते.

......................................

खैरी ते आसेगाव फाटा मार्गावर खड्डे

अचलपूर : तालुक्यातील खैरीकडून आसेगावकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्याने वाहनाधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.