थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:10 AM2021-01-09T04:10:50+5:302021-01-09T04:10:50+5:30

अमरावती : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन व नूतनीकरण अर्ज भरणे सुरू आहे. सन २०२०२-२१ या शैक्षणिक वर्षात ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

Next

अमरावती : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन व नूतनीकरण अर्ज भरणे सुरू आहे. सन २०२०२-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या नव्या विद्यार्थ्यांचा जुन्या विद्यार्थ्यांनासुद्धा अर्ज दाखल करावयाचा असून त्या-त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यासाठी पुढाकार घ्यावयाचा आहे. सामाजिक न्याय विभागात सहायक आयुक्त यांच्या निर्देशानुसार विद्यार्थी वेळेत अर्ज दाखल करतील, अशी खात्री प्राचार्यांनी मिळवून द्यायची आहे.

.................

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

अमरावती : दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचे जत्थे अजूनही रवाना होत आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात कार्यरत शेतकरी बांधवांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. याकरिता ठिकठिकाणी सभा, बैठका आयोजित केल्या जात आहे.

...........

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांचे जतन करावे

अमरावती : यंदा ऐन सोयाबीन संवंगणीच्या वेळेत परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन काळा पडला, बारीक होऊन खराब झाल्याने पुढील खरीप हंगामात बियासाठी चांगल्या सोयाबीनची टंचाई भासणार आहे. वेळेवर कंपनीचे महागडे बियाणे खरेदी करण्याऐवजी आपल्याच शेतात पिकविलेले चाग्ल्या प्रतीचे सोयाबीन जतन करून ठेवणे सोयीचे ठरेल, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

...............

ॲथलेटिस्क जिल्हास्तरीय स्पर्धा

अमरावती : जिल्हा ॲथलेटिस्क संघटना व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० जानेवारी रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात मैदानावर अंडर १४.१६.१८,२० खुला गट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून निवडलेला जिल्हा संघ राज्यस्तरीय सिनियर व ज्युनियर या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.