थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:18 AM2020-12-05T04:18:58+5:302020-12-05T04:18:58+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात शुक्रवारी बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष बबलू ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात शुक्रवारी बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष बबलू देशमुख, विठ्ठल चव्हाण, बाळासाहेब हिंगणीकर, दिनेश टेकाम, रवींद्र मुंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य पदाधिकारी तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.
.........................................................................
शासकीय कार्यालयांना दोन दिवस सुटी
अमरावती : सर्व शासकीय कार्यालयानांना शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्या आहेत. त्यामुळे दोन दिवस सरकारी कार्यालयांना टाळे राहणार आहे. ७ डिसेंबरपासून कामकाज नियमित होईल.
........................................................................................................................
बाजारात तुरीच्या शेंगा आवक
अमरावती : शहरातील भाजी विक्रेत्यांकडे हिरव्या तुरीच्या शेंगा विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. ग्राहकही आवडीने या शेंगा खरेदी करताना दिसत आहेत. तुरीच्या शेंगांना ५० रुपये प्रतिकिलो दर आकारला जात आहे.
......................................................................
झेडपीत निर्लेखित साहित्य पडून
अमरावती : जिल्हा परिषदेच्या आवारात निर्लेखित केलेले भंगार साहित्य पडून आहे. मागील काही महिन्यांपासून साहित्य पडून असताना अद्यापही प्रशासनाला या साहित्त्याची विल्हेवाट लावण्याचा मुहूर्त गवसला नाही.
...........................................................................................
कृषी विषय समितीची सभा
अमरावती : जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा गुरुवारी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतकऱ्यांशी संबंधित विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी सदस्य तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
.........................................................
जलसंपदा विभागासमोर रस्ता उखडला
अमरावती: पंचवटी ते आरटीओ कार्यालयाकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.