संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:15+5:302021-03-25T04:14:15+5:30

अमरावती : युवकाने मद्यावस्थेत घरी येऊन माझे लग्न करून द्या, शेत विका व घर बांधा, अशी मागणी करून संतापाने ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

अमरावती : युवकाने मद्यावस्थेत घरी येऊन माझे लग्न करून द्या, शेत विका व घर बांधा, अशी मागणी करून संतापाने उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतल्याची घटना २२ मार्च रोजी निर्मळपुरा येथे घडली. विनायक निर्मळ (६५) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी विवेक विनायक निर्मळ(३५) विरुद्ध भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------------

महिलेचा विनयभंग

अमरावती : एमआयडीसी कार्यालयात कार्यरत एका महिलेचा पाठलाग करून वाईट नजरेने पाहणे, इतरांना तिच्याबद्दल मेसेज पाठविल्याच्या महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध २२ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. अमित देवीदास कठवे (रा. आर्वी) असे आरोपीचे नाव आहे.

------------------

संचारबंदीचे उल्लंघन, युवकाविरुद्ध गुन्हा

अमरावती : इतवारा स्थित शाहीद दळण केंद्रात विनामास्क वावरणे, उशिरापर्यंत दळण केंद्र सुरू ठेवून संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गस्तीदरम्यान युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. मो. शोयब नूर म्मन्सुरी (३२, मनानगंज) असे आरोपीचे नाव आहे.

-------------------

सरकारी आदेशाचे उल्लंघन, दोघांविरुद्ध गुन्हा

भातकुली : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करता विनामास्क बिनधास्त फिरताना आढळलेल्या दोन युवकाविरुद्ध शासनादेशाच्या उल्लंघन केल्याप्रकरणी भातकुली पोलिसांनी भादंविचे कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटना २२ मार्च रोजी वाल्मिकी चौक आणि बसस्टॉपवर घडल्या. ऋतिक गोविंदराव चैके (१९, रा. ग्रामीण रुग्णालय, भातकुली), धीरज हरिशचंद्र भातकुलकर अशी आरोपींची नावे आहेत.

-------------------

महिलेला अश्लील शिवीगाळ

अमरावती : महिलेने लग्न करण्यास नकार दिल्यावरून आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ केली. ही घटना २२ मार्च रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत गजानननगरात घडली. महिलेच्या तक्रारीवरून अतुल राजू गौर (रा. गणेश पेठ, नागपूर) विरुद्ध २२ मार्च रोजी गुन्हा नोंदविला.

-------------

वाहतुकीस अडथळा, दोघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. प्रवीण मनोहर भालेराव (३८, नवी नस्ती बडनेरा), जयकृष्ण प्रकाश सोळके (२८, रा. उत्तमनगर) असे आरोपीचे नाव आहे. दोघांना समजपत्रावर सोडण्यात आले.

-------------------

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.