थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:02+5:302020-12-06T04:13:02+5:30
अमरावती: जिल्ह्यातील ग्रामीण भागात रबी हंगामाच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला आहे. मागील काही दिवसांपासून रबी हंगामासाठी शेती तयार ...
अमरावती: जिल्ह्यातील ग्रामीण भागात रबी हंगामाच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला आहे. मागील काही दिवसांपासून रबी हंगामासाठी शेती तयार करण्याच्या कामाला वेग आला होता. शेती तयार होताच काही भागांत गहू व हरभरा पिकांची पेरणीसुद्धा करण्यात आली आहे.
................................................................
रिक्त पदांचा अनुशेष कायमच
अमरावती : जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या विभागातील खातेप्रमुखांचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. यात प्रामुख्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी या पदांचा समावेश आहे. रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी पदाधिकाऱ्यांमधून होत आहे.
...............................................................
रोजगार भरती मेळावा बुधवारी
अमरावती : स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे मूलभूत प्रशिक्षण तथा आनुषंगिक सूचना केंद्रात ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील २०१५ ते २०१९ मधील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अंशकालीन प्राचार्य एम.डी. देशमुख यांनी केले आहे.
.............................................
बाजारात संत्र्याची आवक
अमरावती : शहरातील पंचवटी ते कठोरा नाका तसेच अन्य मार्गावर संत्री फळविक्रीची अनेक दूकाने फुटपाथवर लागली आहेत. यंदा भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी संत्री स्वत: ताेडून बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. ग्राहकही आवडीने संत्री खरेदी करताना दिसून येत आहेत.
..............................................................
कृषिपंपांना अखंडित वीज द्या
अमरावती : सध्या खरिपापाठोपाठ ग्रामीण भागात रबी हंगामाची धामधूम सुरू आहे. शेतीला पाणी देण्यासाठी वीजपुरवठा नियमित होत नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ओलिताची कामे करावी लागतात. शेती कूषिपंपाला २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
...........................................................................
खैरी ते येलकी रस्ता दुरुस्तीची मागणी
अचलपूर : तालुक्यातील खैरी ते येलकी गावाकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. अंजनगाव सुर्जी तसेच परिसरातील गावात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा रहदारीचा हा मुख्य मार्ग़ आहे. परंतु, रस्ता नादुरुस्त असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
.............................................................................
ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे
अमरावती : शिक्षक मतदारसंंघाच्या निवडणुकीनंतर आता गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी या निवडणुकीची तयारी गावपातळीवरील राजकीय गटांमध्ये जोरात सुरू झाली आहे.
.....................................................
ग्रामीण भागात लालपरीची प्रतीक्षा
अमरावती : कोरोना संसर्गामुळे मार्चपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत एसटी बस बंद होत्या. आता आंतरजिल्हा तसेच परजिल्ह्यातही बस सुरू करण्यात आल्या. मात्र, ग्रामीण भागात एसटी बसची प्रतीक्षा आहे.
..........................................
पाणीटंचाई आराखड्याची तयारी
अमरावती : उन्हाळ्याच्या दिवसांत भेडसावणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. याकरिता नियोजन केले जात आहे.