संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:19+5:302021-04-08T04:14:19+5:30
ब्राह्मणवाडा थडी : होळीपासून वडिलांकडे वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय महिलेला शेतीच्या वादातून तीन महिलांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची ...
ब्राह्मणवाडा थडी : होळीपासून वडिलांकडे वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय महिलेला शेतीच्या वादातून तीन महिलांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली. याप्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात २४ वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून चंदू भानुदास तायडे, अभिजित अशोक ढोरे, दिनेश राजेंद्र ढोरे, वैभव राजेंद्र ढोरे, दीपक रामराव ढोरे व तीन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ४५२, ३२४, ३५४, २९४, १४३, १४७, १४८, १४९, ३५४ (अ), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. दिनेश व चंदूने टी-शर्ट ओढले, तर इतरांनी काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
------------
निंभा आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण
भातकुली : तालुक्यातील निंभा आरोग्य उपकेंद्रात गुरुवारी १३० कोरोना लसीकरण झाले. सरपंच अविनाश सनके, पोलीस पाटील कुणाल गजभिये, डॉ. अक्षयकुमार निकोसे, डॉ. प्रवीण खराटे, डॉ. निकोसे, आरोग्य सेविका पुष्पा वानखडे,नीलश्री लेंडारे, विजय भुरुले, संदीप चोकरे, छाया ढेंगेकार, गोकुळा खंडारे, परमानंद सोनोने आदींनी परिश्रम घेतले.
-----------
निधन वार्ता
फोटो -
भातकुली : पंचफुलाबाई पांडुरंग सवाई (८०, रा. बहादरपूर) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे व बराच आप्तपरिवार आहे.
---------
विद्याभारती महाविद्यालयात रसायनशास्त्र मंडळाचे उद्घाटन
अमरावती : विद्याभारती महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामध्ये रसायनशास्त्र मंडळाचे आभासी पद्धतीने
उद्घाटन झाले. बनारस हिंदू विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रोफेसर
सुब्रतो भट्टाचार्य,, प्राचार्य पी.एस. येनकर, विभागप्रमुख वंदना पराते, रसायनशास्त्र मंडळाचे अध्यक्ष राहुल लुल्ला, चारूलता देशमुख प्रामुख्याने उपस्थित होत्या.
-----------
शेती अवजारांसाठी अनुदान योजना
पुसला : कृषी विभागाच्या अनेक योजनांत शेतीसाठीची अवजारे अनुदानावर उपलब्ध आहेत. या योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, मळणीयंत्र, पॉवर टिलर, रिज फरो प्लांटर, पेरणी यंत्र, पंपसंच, एचडीपीई, पीव्हीसी पाईप, ठिबक संच, कॉटन श्रेडर आदी यंत्रे अनुदानावर उपलब्ध आहेत. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
-----------
तिवसा नगरपंचायतवर महिलांचा मोर्चा
तिवसा : शहरातील विविध प्रभागातील महिलांनी पाण्यासाठी बुधवारी दुपारी नगरपंचायतवर घागर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले व घोषणा दिल्या. बाजारपेठ येथील मुख्य रस्त्यालागत पशू दवाोखान्याजवळ पाईप लाईन फुटल्याने १५ दिवसांपासून प्रभाग ९ येथील पाणीपुरवठा बंद आहे. मोर्चात माजी सरपंच धनराज थूल, माजी नगरसेवक भूषण यावले, दिलीप शापामोहन हेदेखील उपस्थित होते.
-----------