थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:20+5:302021-04-09T04:14:20+5:30
अमरावती : ग्रामीण भागात उन्हाळी कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. सध्या कांदा काढून त्याची जवण लावली जात आहे. ...
अमरावती : ग्रामीण भागात उन्हाळी कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. सध्या कांदा काढून त्याची जवण लावली जात आहे. कांदा उत्पादक शेतकरी या कामात व्यक्त आहेत.
.............................
सीईओंची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
अमरावती : अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
..............................................
सायकल डे लागला ब्रेक
अमरावती : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आठड्यातून दोन दिवस सायकलने कार्यालयात येण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस ठरवून दिले होते. परंतु सीईओ बदलताच या उपक्रमाला ब्रेक लागला आहे.
..........................................
भूगाव ते परतवाडा रस्त्यावर जीवघेणे खड्डे
अमरावती : भूगाव ते परतवाड्याकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. याशिवाय हा रस्ता उखडला असल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नादुरुस्त असलेला हा रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
..................................................
ग्रामीण कोरोना रुग्णात वाढ
अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहेत. यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.