थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:41+5:302021-06-05T04:10:41+5:30
अमरावती: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी खातेप्रमुखांचा विविध विषयांसंदर्भात आढावा घेतला. यामध्ये महाआवास, स्थायी तसेच ...
अमरावती: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी खातेप्रमुखांचा विविध विषयांसंदर्भात आढावा घेतला. यामध्ये महाआवास, स्थायी तसेच सर्वसाधारण सभा अनुपालनीय मुद्दे, जिल्हा वार्षिक योजनाबाबत प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. सभेला डेप्युटी सीईओ प्रवीण सिनारे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, कार्यकारी अभियंता नीला वंजारी, राजेंद्र सावळकर, शिरीष तट्टे आदी उपस्थित होते.
....................................................
कोविड केअर सेंटरला औषधी भेट
अमरावती : झेडपीच्या विश्रामगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला पवन मेडिकल स्टोअरच्यावतीने सामाजिक बांधीलकी जोपासत विवेक काळबांडे यांनी औषधी साहित्य भेट दिले. यावेळी सुनील कुकडे, पंकज गुल्हाने, मनोज ओळंबे, मनोज चोरपगार, मंगेश वाघमारे, उज्ज्वल पंचवटे, सचिन राऊत आदी उपस्थित होते.
.......................................................
उदेभान शेंडे यांचा आत्मदहनाचा इशारा
अमरावती : कर्जाचा भरणा केल्यानंतरही खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास स्टेट बँक टाळाटाळ करीत असल्याने वनारसी येथील उदेभान शेंडे या शेतकऱ्याने जिल्हाकचेरीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे ४ जून रोजी दिला आहे.
............................
कोरोनामुळे उद्यान बंदच
अमरावती : शहरातील विविध भागांत असलेली उद्याने कोरोनाच्या संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून बंदच आहेत. उद्यान बंद असल्याने चिमुकल्यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.
................................
शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग
अमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी वर्ग खरीपपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. खरीप हंगाम जवळ असल्याने शेतीच्या मशागतीच्या कामालाही वेग आला आहे.