थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:59+5:302021-06-19T04:09:59+5:30

अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी विविध विषयाला अनुसरून पार पडली.अध्यक्ष बबलू देशमुख यांचे अध्यक्षतेखाली या सभेत ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

Next

अमरावती : जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा शुक्रवारी विविध विषयाला अनुसरून पार पडली.अध्यक्ष बबलू देशमुख यांचे अध्यक्षतेखाली या सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

...............................................................

कोविड सेंटर मधील रूग्ण घटले

अमरावती: कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताच जिल्हा परिषद विश्रामगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधील रूग्णाची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे या ठिकाणी बडे रिकामे झाले आहेत.

...........................................................................

स्थायी समितीत इंटनेटचा खोडा

अमरावती : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा ऑनलाईन बोलविण्यात आली होती.या सभेत अचानकच इंटनेट बंद पडल्यामुळे सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला होता.यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.

...............................

खरीप पेरणीच्या कामाला वेग

अमरावती : पावसाचे दिवस सुरू झाले आहेत.त्यामुळे ग्रामीण भागात खरीप पेरणीच्या कामाला वेग आला आहे.सध्या शेतकरी वर्ग पेरणीच्या कामात व्यस्त आहे.

........................................................

लसीकरणाचा वेग मंदावला

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा जिल्हाभरात सुरू असलेला वेग मागील काही दिवसापासून मंदावला आहे. मर्यादित लस उपलब्ध होत असल्याने लसीकरणासाठी अनेक जण अजूनही प्रतिक्षेत आहेत.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.