थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:42+5:302021-06-24T04:10:42+5:30
अमरावती : कानफोडी ते दाऊतपूर गावात रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मुद्यावर आंदोलनाचा इशारा जिल्हा ...
अमरावती : कानफोडी ते दाऊतपूर गावात रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मुद्यावर आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
.............................................
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अडकले
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही झाले नाही. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
..........................
ओबीसी महासंघाचे आंदोलन आज
अमरावती : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी महासंघाच्यावतीने २४ जून रोजी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमाेर आंदोलन केले जाणार आहे.
...........................................
कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण
अमरावती: दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याना मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रेडिएंट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जनरल ड्युटी असिस्टंट कोर्सचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.
........................................
झेडपी समोरील रस्त्यावर वाहनांच्या रांगा
अमरावती : जिल्हा परिषदेसमोरील मुख्य मार्गावर चारचाकी व दुचाकी वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे अन्य वाहतुकीस अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.