थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:26+5:302021-07-01T04:11:26+5:30
अमरावती : महापालिकेकडील थकीत वसुली अगोदर करावी. तोपर्यंत वीजग्राहकांचे कनेक्शन कापू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने ...
अमरावती : महापालिकेकडील थकीत वसुली अगोदर करावी. तोपर्यंत वीजग्राहकांचे कनेक्शन कापू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने बुधवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी किरण गुडदे व पदाधिकारी उपस्थित होते.
..............................
युवा स्वाभिमानची जिल्हा कचेरीवर धडक
अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ सकाळी ७ ते सांयकाळी ९ वाजेपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे युवा स्वाभिमानचे जितू दूधाने, अवि काळे, पराग चिमोटे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
..........................................
कृषी दिनाचे ऑनलाईन प्रक्षेपण
अमरावती : कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप आणि कृषी दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपण केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
..........................................
महापालिकेत आढावा बैठक
अमरावती : महापालिकेत आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत १ जुलै रोजी दुपारी १ वाजता शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
.........................
शाळेतील मैदाने पडले ओस
अमरावती : नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी शाळांमधील मैदाने मात्र ओस पडल्याचे चित्र आहे. विद्यार्थी घरीच असल्याने या परिसरात शुकशुकाट पसरला आहे.