थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:08+5:302021-07-15T04:11:08+5:30

मोर्शी : अडगाव येथील झेडपी शाळेला शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी शाळेत ५० टक्के शिक्षक ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

Next

मोर्शी : अडगाव येथील झेडपी शाळेला शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी शाळेत ५० टक्के शिक्षक उपस्थित होते. अन् ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक काम सुरू असल्याचे दिसून आल्याने सभापतींनी शिक्षकांचा शाल श्रीफळाने गौरव केला.

..........................

शिराळा येथे शिवसंपर्क अभियान

अमरावती : शिराळा येथे शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियान पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख शाम देशमुख, तालुकाप्रमुख आशिष धर्माळे, प्रदीप गौरखेडे व पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

................................

प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा

अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेचा नुकताच झेडपी सीईओ अविश्यांत पंडा यांनी आढावा घेतला. यावेळी संबंधित खातेप्रमुखांमार्फत अधिनस्त यंत्रणेला महत्त्वाच्या सूचना दिल्यात.

.....................................

पावसामुळे शेतीची कामे खोळंबली

अमरावती : काही दिवसांपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे जमीन ओली असल्याने खोळंबली आहेत.

.........................................

ग्रामीण भागात विजेचा लपडांव

अमरावती : काही दिवसांपासून ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.