थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:16+5:302021-07-20T04:11:16+5:30
अमरावती : रविवारी अतिवृष्टीच्या पावसामुळे वलगाव ते आष्टी मार्गालगतच्या शेतात पिके पाण्याखाली आली होती. त्यामुळे या परिसराला तलावाचे स्वरूप ...
अमरावती : रविवारी अतिवृष्टीच्या पावसामुळे वलगाव ते आष्टी मार्गालगतच्या शेतात पिके पाण्याखाली आली होती. त्यामुळे या परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
........................................
शेतीपिकांची नुकसानभरपाई द्या
अमरावती : भातकुली तालुक्यात रविवारी अतिवृष्टीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी हरिभाऊ मोहोड, जयंत देशमुख, मुकद्दरखाँ पठाण आदींनी तहसीलदारांकडे केली आहे.
............................................
सीईओंनी घेतली पशुसंवर्धनचा आढावा
अमरावती : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सोमवारी पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
...............................
शेगाव नाक्यावर वाहतूककोंडी
अमरावती : स्थानिक शेगाव नाका चौकात सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यत वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावर वाहनांची अधिक वर्दळ आहे.
.....................................
कोषागार कार्यालयासमाेरील रस्ता उखडला
अमरावती : जिल्हा कोषागार कार्यालय समोरून अमरावती पंचायत समितीकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.