थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:32+5:302021-07-24T04:10:32+5:30
अंजगाव सुर्जी : तालुक्यातील हिरापूर गावातून जाणाऱ्या बेलगंगा नदीला गुरुवारी पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, सांयकाळी ...
अंजगाव सुर्जी : तालुक्यातील हिरापूर गावातून जाणाऱ्या बेलगंगा नदीला गुरुवारी पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. मात्र, सांयकाळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने संपर्क पूर्ववत झाला आहे.
...........................................
आरोग्य विषय समितीची सभा
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विषय समितीची सभा २२ जुलै रोजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांय्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
...................................
मेळघाटातील इंटनेट सेवा कोलमडली
धारणी : तालुक्यातील बीएसएनएलची इंटरनेट सेवा दोन ते तीन दिवसांपासून कोलमडली आहे. अद्यापही ही सेवा संबंधित विभागाकडून पूर्वरत करण्यात आली नाही.
.............................
पावसामुळे शेतीची कामे खोळंबली
अमरावती : गुरुवारी काही तालुक्यात पडलेल्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहे. शेतात ओलावा असल्याने कुठलीही काम करता येत नाही.त्यामुळे शेतीची कामे तूर्तास थांबली आहेत.
.............................
शेगाव नाका ते कठोरा नाका रस्ता उखडला
अमरावती : शेगाव नाका ते कठोरा नाक्याकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. अतिशय वर्दळीच्या या मार्गावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.