थोडक्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:13 AM2021-07-28T04:13:49+5:302021-07-28T04:13:49+5:30
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे लोखंडी पाईप आडवा लावून वाहनांची नाकाबंदी ...
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे लोखंडी पाईप आडवा लावून वाहनांची नाकाबंदी करण्यात आली आहे.
..................
जलजीवन मिशनचा पंधरवडा सुरू
अमरावती : जलजीवन मिशन अंतर्गत गावकृती आराखडे तयार करण्यासाठी ग्रामीण भागात पंधरवडा अभियान सुरू झाले आहे. याअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
........
बस स्थानकावर गर्दी वाढली
अमरावती : स्थानिक मध्यवर्ती बसस्थानकावर मागील काही दिवसांपासून प्रवाशांची गर्दी वाढली आहे. एरवी प्रवाशांअभावी खाली धावणाऱ्या बसेसमध्ये प्रवासीसंख्याही वाढली आहे.
..........................................
अशोक कॉलनीत रस्ता दुरुस्तीची मागणी
अमरावती : स्थानिक अर्जुननगर येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वर्दळ अशोक कॉलनी येथून होत असल्याने रस्ता उखडला आहे. हा रस्ता दुरुस्तीची मागणी स्थानिकांनी केली आहे.
.............................
बदल्यांमुळे वाढली वर्दळ
अमरावती : जिल्हा परिषदेत सोमवारपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाईन प्रक्रिया असली तरी कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे.