संक्षिप्त पान २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:22+5:302021-01-14T04:12:22+5:30

------------ मुंड निशंकराव शिवारात केबल लंपास नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मुंड निशंकराव शिवारातील शिवशंकर दिगंबरराव श्यामसुंदर (२७, रा. सुभाष ...

Brief page 2 | संक्षिप्त पान २

संक्षिप्त पान २

Next

------------

मुंड निशंकराव शिवारात केबल लंपास

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मुंड निशंकराव शिवारातील शिवशंकर दिगंबरराव श्यामसुंदर (२७, रा. सुभाष चौक, नांदगाव खंडेश्वर) यांच्या शेतातून ६५ फूट केबल लंपास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

लोणीनजीक दुचाकीला अपघात

बडनेरा : नजीकच्या लोणी येथे पोल्ट्री फार्मनजीक ट्रकने दिलेल्या धडकेत राजू शेलुकार व कमल किसन शेलुकार (१९, रा. मूर्तिजापूर) हे दुचाकीस्वार जखमी झाले. लोणी पोलिसांनी ट्रकचालक प्रकाश राजेंद्र साखरे (३९, रा. पारधेवाडी, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

कळाशी येथे विवाहितेचा छळ

खल्लार : नजीकच्या कळाशी येथे २५ वर्षीय विवाहितेने सासरी छळ होत असल्याची तक्रार केली. त्यावरून खल्लार पोलिसांनी रामकृष्ण रामनाथ पवार, रामनाथ गणेश पवार व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

विनायक गुरुकुल येथे जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती

अमरावती : स्थानिक विनायका गुरुकुल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती पार पडली. याप्रसंगी मुख्याध्यापक आरती निर्मळ, अनघा सेनाड, सुहासिनी चेडे, विभा ठाकरे, दीपाली लवटे, कांचन काळे, रूपाली खराबे, निकिता गोलाईत, पूनम राऊत उपस्थित होत्या.

-------------

‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’चे आयोजन

भातकुली : राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील तसेच छंदप्रेमी, हौशी, व्यावसायिक व्हिडिओग्राफर यांना सहभागी होता येईल.

-------------

मतदानासाठी न्यायालयांना सुटी

पुसला : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्ह्यातील सर्व न्यायालये, तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अपीलीय, दिवाणी व फौजदारी न्यायालयांना शुक्रवारी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

--------------मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

राजुरा बाजार : केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया उपक्रमात अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकासाठी मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी समाजकल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.

--------------

सहकार व्यवस्थापनाबाबत टपाली अभ्यासक्रम

अंजनसिंगी : राज्य सहकारी संघातर्फे चालविल्या जाणाऱ्या सहकारी व्यवस्थापन पदविका वर्ग आता दूरस्थ शिक्षणांतर्गत टपाली पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी इच्छुकांकडून ३१जानेवारीपर्यंत अर्ज मिळणे आवश्यक आहे. इच्छुकांनी जिल्हा सहकारी बोर्डाच्या कार्यालयात संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

000

Web Title: Brief page 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.