उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:17 AM2021-08-13T04:17:12+5:302021-08-13T04:17:12+5:30

गरीब लाभार्थींची अडचण; ८०० रुपयांचे सिलिंडर कसे परवडेल? अमरावती : धूरमुक्त स्वयंपाकघर या संकल्पनेला छेद देणारी गॅस सिलिंडरची गगनचुंबी ...

Bright again on the stove; Connection free, but how to fill the gas? | उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

Next

गरीब लाभार्थींची अडचण; ८०० रुपयांचे सिलिंडर कसे परवडेल?

अमरावती : धूरमुक्त स्वयंपाकघर या संकल्पनेला छेद देणारी गॅस सिलिंडरची गगनचुंबी दरवाढ केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी राबविलेल्या उज्ज्वला योजनेसाठी अडसर ठरत आहे. लाभार्थींना मोफत कनेक्शन दिले असले तरी सिलिंडरची दरवाढ थांबलेली नाही. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्यांनी एवढा महागडा दराचा गॅस कसा भरावा, असा प्रश्न भेडसावत आहे.

कोरोनाने कंबरडे मोडलेले लाभार्थी गॅस सिलिंडरच्या दरवाढीने त्रस्त आहेत. उत्पन्नाचे स्रोतात महागडे सिलिंडर भरून घेेणे कठीण झाल्याने ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यात अनेकांचे रोजगार गेले. हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्व काही रुळावर येत असल्याचे वाटत असतानाच पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत मोठी दरवाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांसोबत गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले. उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांची इंधन जमा करण्याची कटकट मिटली, असे म्हणत नाही तोच गॅस सिलिंडरची दरवाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.त्यामुळे मोलमजुरी करून गॅस सिलिंडर कसा भरून घ्यावा, असा प्रश्न भेडसावत आहे. परिणामी नाईलाजाने अनेक कुटुंबे पूर्वीच्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

बॉक्स

गॅस सिलिंडरचे दर रुपयात

जानेवारी २०१९-७१३

जानेवारी २०२० - ७३५

जानेवारी २०२१ - ७७९

ऑगस्ट २०२१ - ८६८

बॉक्स

जिल्ह्यातील उज्ज्वला योजनेचे लाभार्थी - १३१२४८

बॉक्स

सिलिंडर भरणे कसे परवडणार?

कोट

अनलॉक झाले असले तरी रोजगार उपलब्ध झालेला नाही. हातमजुरी करून मिळणाऱ्या पैशांत काही बाजूला टाकून त्यातून सिलिंडर आणण्याची स्थिती आता नाही. पैसा शिल्लक पडला की, तजवीज करू. तोपर्यंत लाकडावर स्वयंपाक करणे भाग आहे.

- सुभद्रा मानकर, लाभार्थी

कोट

गॅस सिलिंडरच्या दरवाढीने चुलीचा वापर वाढला आहे. सरकारने रॉकेल देणे बंद करून सर्वसामान्यांचे मोठे नुकसान केले. आमच्याकडे दरमहा एक सिलिंडरचा वापर होतो. सरकारने गॅसचे दर कमी करावे.

- सविता सहारे, लाभार्थी

कोट

उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर मिळाले. मात्र, दर वाढल्याने आता ते परवडेनासे झाले आहे. त्यात रॉकेल नसल्याने स्टोव्हसुद्धा बंद आहे. नाईलाजास्तव चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली आहे.

- छबू उके, लाभार्थी

Web Title: Bright again on the stove; Connection free, but how to fill the gas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.