ब्रिटिशकालीन तिजोरीला ‘आॅनलाईन’चा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:45 PM2017-12-20T23:45:24+5:302017-12-20T23:46:59+5:30

ब्रिटिश काळापासून प्रशासनात अस्तित्वात असलेल्या मजबूत तिजोऱ्या आता आॅनलाईन आर्थिक व्यवहारांमुळे इतिहासजमा झाल्या आहेत.

British crashed with 'online' fire | ब्रिटिशकालीन तिजोरीला ‘आॅनलाईन’चा फटका

ब्रिटिशकालीन तिजोरीला ‘आॅनलाईन’चा फटका

Next
ठळक मुद्देरोखीचे व्यवहार बंद : आता केवळ शोभेच्या वस्तू

जितेंद्र दखने ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : ब्रिटिश काळापासून प्रशासनात अस्तित्वात असलेल्या मजबूत तिजोºया आता आॅनलाईन आर्थिक व्यवहारांमुळे इतिहासजमा झाल्या आहेत. ही स्थिती राज्यातील सर्वच विभागांमध्ये उदयास आली आहे. मात्र, त्या काढून टाकण्याऐवजी त्यांचे जतन करण्याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये एकमत आहे.
एकेकाळी शासन-प्रशासनात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन, देयके, अनुदान वाटपाची प्रक्रियाही रोखीने व्हायची. विभागाच्या मागणीनुसार रोखीने पैसे प्राप्त व्हायचे. त्या काळात बँक किंवा रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याने मजबूत तिजोरी हाच एकमात्र पर्याय होता. कालातंराने आर्थिक व्यवहारासाठी बँकांना सुरूवात झाली. शासनाने रोखीचे व्यवहार हळूहळू कमी केले. धनादेशाने व्यवहार सुरू झाल्याने पैसे ठेवण्यासाठी तिजोरीचा वापर कालबाह्य होत चालला. धनादेशानंतर शासनाने आता खात्यात वेतन, अनुदान (डीबीटी, आरटीजीएस) या प्रणालीचा वापर सुरू केला. त्यामुळे जमिनीत पुरलेल्या अथवा भिंतीत बसविलेल्या तिजोºयांचा वापर पूर्णत: बंद होण्याची स्थिती राज्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांची आहे.
‘झीरो पेन्डसी’अंतर्गत काही विभागात जुने-नवीन अभिलेखांचे वर्गीकरण करण्यात आले. यात ब्रिटिशकालीन तिजोऱ्यांचा आवर्जून उल्लेख नोंदविला गेला. या तिजोºयांनी प्रशासकीय कामकाजाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. वजनी आणि मजबूत प्रत्येक लोखंडी तिजोरी क्विंटलपेक्षा जास्त वजनाच्या आहेत.
शतकोत्तर वारसा
ब्रिटिश शासनापासून अस्तित्वात असलेल्या वजनदार तिजोऱ्यांना शतकोत्तर वारसा लाभला आहे. एकेकाळी प्रशासनात रोखीने व्यवहार चालायचे. पूर्वीच्या काळी रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी तिजोरीशिवाय पर्याय नव्हता. या तिजोऱ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, त्यांच्या चाव्या व लॉक सिस्टीममुळे त्यांची चर्चा प्रशासकीय वर्तुळात नेहमीच होत असते. गत पिढीतील अधिकारी-कर्मचारी या तिजोºयांचा विषय निघताच हळवे होतात. काळानुरूप तिजोऱ्यांचे महत्त्व कमी झाले आणि बँकांच्या लॉकरचा वापर सुरू झाला आहे. तरीही त्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. या तिजोऱ्यांचा आता ऐतिहासिक ठेवा म्हणून संवर्धन होणे गरजेचे आहे.

ब्रिटिशकालीन तिजोºयांशी प्रशासनाचे भावनिक नाते आहे. हा अनमोल ठेवा आहे. त्यांची किंमत मोजता येणार नाही. त्यांचे भावी पिढीसाठी जतन केल्यास सयुक्तिक ठरेल.
- किरण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या तीन ते चार विभागांमध्ये जुन्या लोखंडी तिजोºया कायम आहेत. मात्र, या तिजोºयांमध्ये पैसे ठेवले जात नाहीत. पुरातन वस्तू म्हणून त्यांचे संवर्धन केले जाते.
- कै लास घोडके, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन, जि.प.

Web Title: British crashed with 'online' fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.