ब्रॉडगेज मेट्रो अमरावतीपर्यंत धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:54+5:302021-02-11T04:14:54+5:30
अमरावती : नागपूर मेट्रोच्या विस्तारीकरणात विदर्भातील महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. त्यानुसार द्रुतगती ब्रॉडगेज मेट्रो अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकापर्यंत ...
अमरावती : नागपूर मेट्रोच्या विस्तारीकरणात विदर्भातील महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. त्यानुसार द्रुतगती ब्रॉडगेज मेट्रो अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकापर्यंत धावेल. बडनेराचाही त्यात समावेश असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मरावतीपर्यंत मेट्रो मंजूर केली आहे. सुनील देशमुख यांनी त्याअनुषंगाने मागणी करणारे पत्र गडकरी यांनी लिहिले होते.
अमरावती शहर औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेत आलेले नाही. वेगवान दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयी नसणे हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे. देशातील पहिल्या व अभिनव अशा ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प विस्तारात यपूर्वी बडनेराचा समावेश होता. ब्रॉड गेज मेट्रोचा मार्ग निर्धारित करीत असताना व्हाया बडनेरा - अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकापर्यंतचा मार्ग निर्धारित करण्याची लोकांची मागणी आहे. अपेक्षित प्रवासीसंख्याही त्यामुळे मिळू शकेल. मेट्रो परिचालनास सहाय्य होईल, असे समीकरण सुनील देशमुखांनी गडकरी यांच्यासमक्ष मांडले. विस्तारीकरणाच्या अनुषंगाने भविष्यातील योजनेत अमरावतीचा समावेश करण्याची विनंती मान्य करण्यात आल्याचे गडकरी यांनी पत्राद्वारे कळविले आहे. यासंबंधीचे इतर तपशील योग्य वेळी निश्चित केले जातील, असेसुद्धा गडकरी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. ब्रॉडगेज मेट्रो या द्रुतगती दळणवळणाच्या सोयीमुळे नागरिकांना जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा मिळणार असून संपूर्ण पश्चिम विदर्भातील उद्योग वृद्धीला याचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर ते अमरावती हा प्रवास केवळ तासाभरात करणे शक्य होणार आहे.