तुटलेल्या फांद्या रस्त्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:47+5:302021-07-12T04:09:47+5:30

---------------------------------------------------- शहरात कोरोनाचा संसर्ग माघारला अमरावती : दोन महिन्यांपासून शहरातील कोरोनाचे संसर्गात कमी आलेली आहे. आता तर १० च्या ...

Broken branches lying on the road | तुटलेल्या फांद्या रस्त्यावर पडून

तुटलेल्या फांद्या रस्त्यावर पडून

Next

----------------------------------------------------

शहरात कोरोनाचा संसर्ग माघारला

अमरावती : दोन महिन्यांपासून शहरातील कोरोनाचे संसर्गात कमी आलेली आहे. आता तर १० च्या आत कोरोनाची रुग्णसंख्या राहत असल्याने दिलासा मिळाला आहे.

-----------------------------------------------------

रविवारी दिवसभर पावसाची उसंत

अमरावती : शनिवारी सायंकाळपासून दमदार पावसाने नऊ मंडळात अतिवृष्टी झाली. रविवारी दिवसभर अमरावती शहरात ढगाळ वातावरण असताना पावसाने उघाड दिली.

------------------------------------------------------

मेळघाट पावसात माघारले

अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झालेला आहे. किंबहुना धारणी तालुक्यात यंदा जिल्ह्यात सर्वांत कमी पावसाची नोंद झाली.

-------------------------------------------------------

स्वच्छता नसल्याने डेंग्यू पसरणार

अमरावती : शहरात अनेक प्रभागात कचऱ्याचे ढीग पडून राहतात. त्यामधील वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे शहरात यंदा डेंग्यू पसरण्याची भीती आहे.

-------------------------------------------------------

अंतर्गत रस्त्यांची लागली वाट

अमरावती : अर्जुननगरात अलिकडच्या दोन वर्षात तयार करण्यात आलेले रस्ते ठिकठिकाणी फुटलेले आहेत. त्यामुळे त्या कंत्राटदारांकडून रस्ते दुरुस्त करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

--------------------------------------------------------

शिवारांमध्ये दुबार पेरण्यांना गती

अमरावती : जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनच्या पेरण्यांना पावसाअभावी काही भागात मोड आली होती. आता शनिवारपासून दमदार पाऊस झाल्याने या पेरण्यांना गती आलेली आहे.

-------------------------------------------------------

कोरोनाचे २८६ ॲक्टिव्ह रुग्ण

अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे २८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये ७७ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. उर्वरित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

-------------------------------------------------------

Web Title: Broken branches lying on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.