हुंड्यासाठी मोडले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:07+5:30

मजुरी करून पोट भरणाऱ्या जरूड येथील एका पित्याने त्यांच्या २२ वर्षीय मुलीचे लग्न शेंदूरजनाघाट येथील शुभम बागडे (२८) याच्याशी पक्के केले. त्यानुसार, ३ जुलै रोजी जरूड येथे साक्षगंध सोहळा पार पडला. साक्षगंधादरम्यान होणाऱ्या जावयाला ७ ग्रॅमची अंगठी व १५ ग्रॅम सोन्याचा गोफ असा १ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने दिले.

Broken marriage for dowry | हुंड्यासाठी मोडले लग्न

हुंड्यासाठी मोडले लग्न

Next
ठळक मुद्देउपवर तरुणीचा स्वप्नभंग : तीन लाखांची मागणी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/जरूड : हुंडा म्हणून तीन लाख रुपये देण्यास नकार दिल्याने उपवर मुलाने नियोजित लग्न उधळून लावल्याची धक्कादायक घटना जरूड येथे घडली. साक्षगंधाच्या अवघ्या महिनाभरात त्या उपवर तरुणीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी शेंदूरजनाघाट येथील उपवर मुलासह त्याच्या कुटुंबातील अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मजुरी करून पोट भरणाऱ्या जरूड येथील एका पित्याने त्यांच्या २२ वर्षीय मुलीचे लग्न शेंदूरजनाघाट येथील शुभम बागडे (२८) याच्याशी पक्के केले. त्यानुसार, ३ जुलै रोजी जरूड येथे साक्षगंध सोहळा पार पडला. साक्षगंधादरम्यान होणाऱ्या जावयाला ७ ग्रॅमची अंगठी व १५ ग्रॅम सोन्याचा गोफ असा १ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने दिले.
साक्षगंध निर्विघ्न आटोपल्याने मुलीकडील मंडळी आनंदी होती. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली असताना, वरपक्षाकडील मंडळीने तीन लाख रुपये हुंड्याची मागणी केली. ते ऐकून वधुपित्याच्या पायाखालची जमीन सरकली. साक्षगंधात १ लाख १५ हजारांचे दागिने, पाच हजार रुपयांचे कपडे व अन्य खर्च झाला असताना, आता तातडीने तीन लाख रुपये कुठून द्यायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला.
हुंड्याची रक्कम देण्यास वधुपित्याने नकार दिला. त्यामुळे उपवर मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. आरोपी उपवर शुभम बागडे याने वाग्दत्त वधूला फोन करून विवाहास नकार कळविला. यासोबतच साक्षगंधात मिळालेला सोन्याचा गोफ, अंगठी परत करणार नसल्याचेही सांगितले. त्यामुळे वधुपक्षाकडील मंडळी कोलमडून पडली.
उपवर मुलासह त्याच्या कुटुंबातील चौघांनी आपल्या कुटुंबासह मुलीचा विश्वासघात केल्याची तक्रार वधुपित्याने ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी वरूड पोलीस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी उपवर मुलगा शुभम बागडे, दिवाकर बागडे (५५), संकेत दिवाकर बागडे (३२), विठ्ठल ऊर्फ विठ्ू दिवाकर बागडे (२६) व एका महिला यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ५००, ५०७, ३४ व हुंडाबळी अधिनियमाच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

केव्हा सुधारणार?
जेवढे जास्त पंगतीला पाहुणे, तेवढे मोठे लग्न ही संकल्पना कोरोनाने धुळीस मिळविली. आता जिवाच्या भीतीने वºहाडी मंडळीच लग्नापासून दूर राहत आहेत. त्यातच शासनाच्या बडग्याने वºहाड्यांची संख्या ५० वर आली आहे. मात्र, हुंड्याची रक्कम कोरोनाकाळातही ‘जैसे थे’ आहे. समाजात बिकट प्रसंग उभा करणाऱ्या व दोन्ही पक्षांसाठी नाचक्की ठरणाऱ्या हुंड्याबाबत केव्हा सुधारणार, हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.

Web Title: Broken marriage for dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.