इर्विन रुग्णालयात पुन्हा दलाल सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:10+5:302021-07-23T04:10:10+5:30

आरोपी सिटी पोलिसांच्या ताब्यात : महिलेकडून अतिरिक्त पैसे उकळले अमरावती : इर्विन रुग्णालयात गुरुवारी एका शिक्षक महिलेकडून अडीच हजार ...

Brokers re-activated at Irvine Hospital | इर्विन रुग्णालयात पुन्हा दलाल सक्रिय

इर्विन रुग्णालयात पुन्हा दलाल सक्रिय

Next

आरोपी सिटी पोलिसांच्या ताब्यात : महिलेकडून अतिरिक्त पैसे उकळले

अमरावती : इर्विन रुग्णालयात गुरुवारी एका शिक्षक महिलेकडून अडीच हजार रुपये घेऊन लवकरच फिटनेस सर्टिफिकेट मिळवून देतो, असे म्हणून एजन्टने फसवणूक केल्याची घटना उघड झाली. डॉक्टरांच्या सतर्कतेने सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी निखिल वाळवे नामक एजंटला ताब्यात घेतले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या नावावर दलालांनी सर्वसामान्यासह कर्मचाऱ्यांची लुबाडणूक चालविल्याचे वृत्त लोकमतने यापूर्वी लोकदरबारात मांडले होते. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या एजन्टवर कारवाईच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांसह सिटी कोतवाली ठाण्यात तक्रारदेखील केली होती. त्याच्याविरुद्ध कारवाई केली. त्यामुळे काही महिने रुग्णालयात अशा दलालांचा सुळसुळाट थांबला होता. मात्र, आता पुन्हा हे दलाल सक्रिय झाल्याचे आजच्या कारवाईतून समोर आले आहे.

Web Title: Brokers re-activated at Irvine Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.