‘बीएसएनल’ची महाकृषी सेवा महागली

By admin | Published: November 4, 2015 12:20 AM2015-11-04T00:20:02+5:302015-11-04T00:20:02+5:30

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महाकृषी एक...

BSNL's MahaGari service is expensive | ‘बीएसएनल’ची महाकृषी सेवा महागली

‘बीएसएनल’ची महाकृषी सेवा महागली

Next

शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री : १ नोव्हेंबरपासून लागू, १४१ रुपये मोजावे लागणार
अमरावती : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महाकृषी एक आणि दोन यांच्या सीयूजी कॉलिंग सुविधेत आता महाकृषी तीन या सुविधेचा समावेश करून एकत्र सीयूजी प्लॅन तयार करण्यात आला आहे. ही सुविधा १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली. यामध्ये समाविष्ट ग्राहक ‘अनलिमिटेड’ बोलू शकणार आहे. मात्र यासाठी आता १०८, १०९ व १२८ रुपयांऐवजी १४१ रुपये मोजावे लागणार असल्याने शेतकऱ्यांत मात्र नाराजी आहे.
राज्यात बिएसएनएलचे कृषी प्लॅन अंतर्गत १२ लाख ग्राहक आहेत. जिल्ह्यात बीएसएनएलचे दीड लाख ग्राहक आहेत. यापैकी किसान प्लॅन अंतर्गत ३५ हजार ग्राहक आहेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, आणि शेतकऱ्यांमधील संवाद वाढावा, कमी खर्चात समन्वय साधला जावा, या हेतूने बीएसएनएलने सुरू केलेल्या ‘मोबाईल टू मोबाईल फ्री’ या महाकृषी संचार सुविधेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. याबाबतच्या तीनही योजनांचे समायोजन करून नव्या स्वरुपात ही योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे राज्यातील १२ लाख शेतकरी आता एकमेकांशी मोफत संवाद साधू शकणार आहेत.
शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला, खते बी-बियाण्यांची उपलब्धता, गुणवत्तेबाबत येणाऱ्या अडचणी, कृषी विभागांच्या विविध योजनांची माहिती त्वरित कमी खर्चात मिळावी, यासाठी सर्वात महत्त्वाची ‘क्लोज युजर ग्रुप’ (सीयुजी) भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यासाठी ‘भारत संचार निगम या कंपनीची निवड करण्यात येऊन २०११ पासून ही सेवा सुरू आहे. मात्र या तिन्ही सेवा एकत्रित करून शुल्कात वाढ करण्यात आली व डेटादेखील कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BSNL's MahaGari service is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.