बसपाचे एकदिवसीय धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:36+5:302021-07-30T04:12:36+5:30
ओबीसींची जातीनिहाय जनगणना नाही, संसदेतील वक्तव्याचा मोर्शीत निषेध मोर्शी : ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणार नाही, असे संसदेमध्ये जाहीर केल्याबद्दल ...
ओबीसींची जातीनिहाय जनगणना नाही, संसदेतील वक्तव्याचा मोर्शीत निषेध
मोर्शी : ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणार नाही, असे संसदेमध्ये जाहीर केल्याबद्दल बसपा मोर्शी विधानसभा अध्यक्ष महेंद्र भातकुले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ओबीसींसंदर्भात मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही, तर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, राजकीय आरक्षण पुनर्स्थापित झाले पाहिजे, सर्व ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे, विद्यार्थ्यांना मेडिकल, आयआयटी, आयपीएसमधील आरक्षण मिळालेच पाहिजे, ओबीसीची क्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले काळे कायदे रद्द करण्यात येऊन त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, अशा मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या.