१२० दिवसांनंतर बीटीच्या जनुकीय शक्तीत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 10:54 PM2018-03-06T22:54:21+5:302018-03-06T22:54:21+5:30

बीटी कपाशी १२० दिवसांची झाल्यानंतर तिच्यात अंगभूत असलेल्या जनुकांची परिणामकारकता नैसर्गिकरीत्या कमी होत जाते.

BT's genetic potential decreases after 120 days | १२० दिवसांनंतर बीटीच्या जनुकीय शक्तीत कमी

१२० दिवसांनंतर बीटीच्या जनुकीय शक्तीत कमी

Next
ठळक मुद्दे‘आयएससीआय’ संस्थेची माहिती : बोंडअळीचे जीवनचक्राचा ब्रेक महत्त्वाचा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : बीटी कपाशी १२० दिवसांची झाल्यानंतर तिच्यात अंगभूत असलेल्या जनुकांची परिणामकारकता नैसर्गिकरीत्या कमी होत जाते. त्यामुळे बीटीअंगी गुलाबी बोंडअळीला प्रतिकार करण्याची कमी होते व पीक किडीला बळी पडते. किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे वास्तव ‘आयएससीआय २२व एसएबीसी’ संस्थेच्या अहवालात स्पष्ट आहे.
मध्य विभागात कपाशी शेवटच्या तोड्यानंतर थांंबविण्याऐवजी एप्रिल-मेपर्यंत उत्पादनक्षम ठेवले जाते. हे आर्थिक फायद्याचे असले तरी त्यामुळे कपाशीची वर्षानुवर्षे उत्पादनातील शाश्वतताच संपविण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळी थंडीच्या कालावधीतील कीड आहे. राज्यात तिचा उद्रेक आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होतो व किडीमुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान होते, जे टाळता येऊ शकते, जानेवारीनंतर ही कीड पीक नसताना त्यांच्या अवशेषामध्ये कोषावस्थेत असते. मात्र, जानेवारीनंतर पीक उपलब्ध असल्यास ही अळी कोषावस्थेत न जाता नव्याने येणाºया बोंडावर उपजीविका करते. त्यामुळे अळीचे जीवनचक्र नष्ट करण्यासाठी कपाशीची फरदड न घेणेच फायद्याचे आहे.
रेफ्यूजी पिकांची लागवड न करणे हे गुलाबी बोंडअळीत बीटी प्रतिकारकता वाढविण्याचे मुख्य कारण आहे. एक तर शेतकºयांनी लागवडीकडे दुर्लक्ष केले किंवा कमी प्रमाणात लागवड केली. यामुळे अळी कायमच बीटी कपाशीच्या संपर्कात राहून त्यात बीटी प्रतिकारकता विकसित झाली. गुलाबी बोंडअळी ही एकाच पिकावर (मोनोफॉस) गुजराण करणारी आहे, तर उर्वरित प्रकारच्या बोंडअळ्या अनेक पिकांवर किंवा वनस्पतीवर जगत असतात. एकच पीक सतत उपलब्ध असल्यानेही गुलाबी अळीत प्रतिकारक्षमता वेगाने विकसित झाली असल्याचे या पुस्तिकेत स्पष्ट केले आहे.
बीटीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब ही महत्त्वाची बाब आहे. उन्हाळ्यात खोलवर नांगरणी केल्यामुळे बोंडअळी उन्हात उघडी पडून मरते. कोष उघडे पडल्यावर पक्षी ते नष्ट करतात.
मान्सूनच्या पेरणीनंतर पेरणी, कामगंध सापळ्यांचा वापर कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर हंगाम उशिरापर्यत न लांबविणे पिकांच्या अवशेषाचा उन्हाळ्यातच नायनाट करणे तसेच कापसाची साठवणूक व्यवस्थत केली नाही, तर त्यातुनही तग धरून तिचे जीवनचक्र सुरू राहण्याची भीती आहे.

बोंडअळीला उपलब्ध असणारी रेफ्युजी पिके
अमेरिकन बोंडअळी अनेक पिकांवर जगते. तिला चवळी, हरभरा, सूर्यफूल मका , बाजरी, टोमॅटो पर्यायी खाद्य पीक आहे.
ठिपक्यांची बोंडअळी काही पिकांवर जगते. यासाठी कपाशी आणि भेंडी पर्यायी पिके आहेत.
गुलाबी बोंडअळी ही एकाच पिकावर जगते. तिला पर्यायी खाद्य नाही. मात्र, भेंडी हे यजमान पर्यायी आहे.
तंबाखूची पाने खाणारी अळी अनेक पिकांवर गुजराण करते. तिला भाजीपाला, सोयाबीन व एरंडी पर्यायी पीक आहे.

Web Title: BT's genetic potential decreases after 120 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.