पशुवैद्यकीय दवाखान्यात कूपनलिका अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:03 PM2017-11-12T23:03:57+5:302017-11-12T23:04:23+5:30

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील पशुवैद्यकीय दवाखान्यांची नवीन इमारत बांधकाम करताना पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी यापुढे अंदाजपत्रकातच कूपनलिका अनिवार्य करण्यात आली आहे.

Bucket Essentials in Veterinary Clinic | पशुवैद्यकीय दवाखान्यात कूपनलिका अनिवार्य

पशुवैद्यकीय दवाखान्यात कूपनलिका अनिवार्य

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : पशुसंवर्धन समिती सभेत ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील पशुवैद्यकीय दवाखान्यांची नवीन इमारत बांधकाम करताना पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी यापुढे अंदाजपत्रकातच कूपनलिका अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीने ठराव घेतला.
पशुसंवर्धन समितीची सभा विविध विषयांनी अनुसरून १० नोव्हेंबर रोजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्या दालनात पार पडली. समिती सदस्य शरद मोहोड यांनी प्रस्ताव मांडला. त्याला उपाध्यक्ष तथा सभापती दत्ता ढोमणे यांनी एकमताने मंजुरी दिली. नॅशनल डेअरी बोर्ड व राज्य शासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मदर दूध संकलन केंद्रे सध्या सहा तालुक्यांतील २४० गावांमध्ये सुरू आहेत. याशिवाय येत्या जानेवारीपासून मेळघाटातील धारणी, चिखलदरा व अचलपूर तालुक्यातही मदर दूध डेअरी संकलन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी दिली. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अहल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळ राबविणार आहे. पात्र लाभार्थींनी १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे आॅनलाइन अर्ज करावे, असे आवाहन ढोमणे व रहाटे यांनी केले. निवडीसाठी पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या नेतृत्वातील समिती राहणार आहे. यावेळी इतरही मुद्द्यांवर सदस्य शरद मोहोड, सुखदेव पवार यांनी चर्चा केली. रहाटे यांनी प्रशासनाच्या कारवाईबाबत माहिती देऊन सदस्यांचे समाधान केले. सभेला समिती सदस्य प्रियंका दाळू, छबूबाई जाधव, सुखदेव पवार, सचिन पाटील, शरद मोहोड, पशुसंर्वधन अधिकारी तांत्रिक मिलिंद काळे व तालुका पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.
सहा ठिकाणी पशुधन मेळावे
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्यावतीने यंदाही सहा गावांमध्ये भरणाºया यात्रा महोत्सवात पशुसंर्धन मेळावे घेतले जाणार आहेत. यात बहिरम, टिटंबा, सालबर्डी, ऋणमोचन, वाढोणा रामनाथ, तळेगाव दशासर आदी गावांचा समावेश आहे.

Web Title: Bucket Essentials in Veterinary Clinic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.