सावित्रीचा वसा जोपासणारी ‘बुधवारा मुलींची शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:00 AM2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:34+5:30

नेहरू मैदानातून सन-२००२ मध्ये हे हायस्कूल बुधवारा येथे स्थलांतरित झाले. समाजात मुलींचे शिक्षण दुर्लक्षित, असा समज असताना तत्कालीन मुख्याध्यापक सविता चक्रपाणी, वीणा देशमुख, अरूणा डांगे, भुयार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे ही शाळा मुलींच्या पटसंख्येत सतत आघाडीवर आहे. या शाळेच्या सर्व वर्गखोल्या डिजिटल आहे.

'Budhwara school for girls' | सावित्रीचा वसा जोपासणारी ‘बुधवारा मुलींची शाळा’

सावित्रीचा वसा जोपासणारी ‘बुधवारा मुलींची शाळा’

Next
ठळक मुद्देडिजिटल वर्गखोल्या : इंग्रजी शिक्षणासाठी अ‍ॅप, ई-लर्निंग प्रणाली, गुणवत्तापूर्ण शिक्षण, दहावीचा निकाल उत्कृष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुली केवळ ‘चूल आणि मूल’ एवढ्यावर सीमित नसून, त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा जोपासावा. शिकून मोठे व्हावे, विविध क्षेत्रांत ठसा उमटावा, त्याकरिता बुधवारा स्थित महापालिका मराठी मुलींचे हायस्कूल आघाडीवर आहे. या शाळेला ‘एनपीजीईएल’ अंतर्गत २००८ मध्ये आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे.
नेहरू मैदानातून सन-२००२ मध्ये हे हायस्कूल बुधवारा येथे स्थलांतरित झाले. समाजात मुलींचे शिक्षण दुर्लक्षित, असा समज असताना तत्कालीन मुख्याध्यापक सविता चक्रपाणी, वीणा देशमुख, अरूणा डांगे, भुयार यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे ही शाळा मुलींच्या पटसंख्येत सतत आघाडीवर आहे. या शाळेच्या सर्व वर्गखोल्या डिजिटल आहे.
शिक्षक आणि लोकसहभागातून टीव्ही, प्रोजेक्टर, साहित्य सदर शाळेला भेट मिळाले आहेत. ई-लर्निंग शिक्षण अनिवार्य आहे. इंग्रजी शिक्षणासाठी ‘रिड टू मी’ अ‍ॅप वापरले जाते. गतवर्षी दहावीत गायत्री राजगुरे ही गुणवत्ता यादीत आली असून, तिने गणितात ९९ गुण प्राप्त केले आहे. माता पालकांसाठी खेळ स्पर्धा, स्नेहसंमेलन, हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम हे वैशिष्ट आहे. विद्या प्राधिकरणातर्फे आयोजित भूमिका पालन स्पर्धेत या शाळेला दोनदा जिल्हास्तरीय प्रथक क्रमांक, तर राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाले आहेत.
येथील उत्कृष्ट बँड पथक महापालिका शाळांसाठी नावलौकिक आहे. किशोरी उत्कर्ष मंच अंतर्गत मुलींसाठी विविध उपक्रम राबविले जातात.

प्रशासकीय सेवेत ठसा
महापालिका मराठी मुलींचे हायस्कूलमधील विद्यार्थिनी केंद्र व राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेत आहे. प्राचार्य, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, बँक मॅनेजर, रेल्वे, पोस्ट सेवा अशा विविध क्षेत्रात मुलींनी ठसा उमटविला आहे.

शाळेत गुणवत्तापूर्व शिक्षणासोबत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींचा सहभाग असतो. यात शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस, चित्रकला, ग्रामगीता तर, हिंदी परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. सामाजिक जाणीवेसाठी जलदिंडी, वृक्षदिंडी, सीड बॉल तर किशोरवयीन मुलींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते.

मुलींचे शिक्षणासह त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांकडे शिक्षिकांचे लक्ष असते. आरोग्य, रक्त गट तपासणी, समुपदेशकांचे मार्गदर्शन हे शाळेचे वैशिष्ट्य आहे. माजी गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान केला जातो.
- रमिया कोठार,
अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

या शाळेचा दर्जेदार शिक्षणासाठी नावलौकिक आहे. त्यामुळेच पटसंख्या उत्तरोत्तर वाढत आहे. मुलींना स्वंयभू निर्भर बनविण्यासाठी महिला पोलीस, शिक्षिकांचे मार्गदर्शन मिळते. डिजिटल वर्ग, ई-लर्निंग शिक्षण हे वैशिष्टे आहे.
- वैशाली कुºहेकर, मुख्याध्यापिका

Web Title: 'Budhwara school for girls'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा