राष्ट्रीय महामार्गावरील गावांमध्ये प्रवासी निवारा, पथदिवे उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:48+5:302021-08-13T04:16:48+5:30
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील परतवाडा ते अकोट ५४८-सी राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी, सातेगाव, चौसाळा, हसनापूर, अडगाव, भंडारज, तुरखेड ...
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील परतवाडा ते अकोट ५४८-सी राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी, सातेगाव, चौसाळा, हसनापूर, अडगाव, भंडारज, तुरखेड आदी गावांना परिसरातील गावे जुळलेली आहेत. अद्याप या गावांच्या थांब्यावर प्रवासी निवारा व पथदिवे बसविण्यात आलेले नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाच्या दिवसात प्रवाशांनी वाहनाच्या प्रतीक्षेत कुठे थांबायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
गावाच्या थांब्यावर पथदिवे नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता प्रवासी निवारा व पथदिवे आदी गावांमध्ये उभारावे, याकरिता सहा महिने आधी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग (अकोला) कार्यकारी अभियंता व तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. परंतु, अद्याप त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने गुरुवारी पुन्हा तहसीलदारांना परतवाडा ते अकोट राष्ट्रीय महामार्गावरील अंजनगाव सुर्जी तालुक्यातून येणाऱ्या सर्व गावांतील थांब्यावर १५ दिवसांत प्रवासी निवारा व पथदिवे न बसविल्यास राष्ट्रवादी युवक अन्यत्याग आंदोलन करेल, असे तालुकाध्यक्ष सागर हुरबडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. कार्याध्यक्ष संदीप खेडकर, उपाध्यक्ष कल्याण गायगोले व शुभम ठाकरे, पुरुषोत्तम ढोले, किरण साबळे, संतोष पोटे, संकेत घोगरे, गोकूळ पडोळे, सार्थक जानोरकार, शुभम बहिरे, सत्यम काळे, सक्षम खलोकार, गौरव वक्ते, योगेश गिते, अनिकेत मसाने, कुलदीपक येवतकार, रुत्विक वैराळे, मोहन घोरमोडे आदी उपस्थित होते.