बिल्डर, उद्योगपतींचे दणाणले धाबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:39 PM2019-01-16T22:39:27+5:302019-01-16T22:39:59+5:30

आयकर विभागाच्या बुधवारच्या धाडसत्रानंतर शहरातील उद्योगपतींसह बिल्डरांचे धाबे दणाणले. विविध जिल्ह्यांतून अमरावतीत दाखल झालेल्या २७ पथकांनी उद्योजक, व्यापारी व बिल्डरांची घरे व कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केल्याने खळबळ उडाली.

Builder, businessman's dash | बिल्डर, उद्योगपतींचे दणाणले धाबे

बिल्डर, उद्योगपतींचे दणाणले धाबे

Next
ठळक मुद्देआयकरचे धाडसत्र : विविध जिल्ह्यांतील पथके शहरात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आयकर विभागाच्या बुधवारच्या धाडसत्रानंतर शहरातील उद्योगपतींसह बिल्डरांचे धाबे दणाणले. विविध जिल्ह्यांतून अमरावतीत दाखल झालेल्या २७ पथकांनी उद्योजक, व्यापारी व बिल्डरांची घरे व कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केल्याने खळबळ उडाली.
आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके बुधवारी सकाळी १० वाजतापासून खासगी वाहनांनी अमरावतीत दाखल झाली. अत्यंत गोपनिय आणि सुनियोजित पद्धतीने आयकर अधिकाºयांनी उद्योजक, बिल्डर व व्यापाºयांच्या घरी व त्यांच्या कार्यालयातील आर्थिक व्यवहारासंबंधी दस्तावेजांची तपासणी सुरू केली.
एकाच वेळी अधिकाºयांनी सर्व ठिकाणी धाडसत्र राबविल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या धाडसत्राची माहिती शहरात वाºयासारखी पसरल्यानंतर व्यवसायिक व बिल्डरांचे धाबे दणाणले. या धाडसत्रामुळे शहरातील व्यापारी वर्गांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एकमेकांना कॉल करून आयकर धाडीसंदर्भात विचारणा केली जात होती.
यांच्या घर, कार्यालयांवर धाडी
अमरावती येथील कॅम्प रोड स्थित प्रवीण मालू यांच्या घर व कार्यालयाचीही आयकर विभागाच्या एका पथकाने झडती घेतली. याशिवाय सुभाष तलडा, ग्रेन मर्चन्ट रामेश्वर गगड, विदर्भ टायरचे गोपाल पनपालीया, बिल्डर अशोक सोनी, बिल्डर कैलास गिरुळकर, उद्योगपती शंकर बत्रा यांच्याकडे आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रायफलधारी जवान तैनात
पथकाला रायफलधारी पोलिसाचा बंदोबस्त देण्यात आला आहे. प्रत्येक पथकासोबत एक ते दोन कर्मचारी आहेत. पोलिसांनी बाहेरील कोणत्याही व्यक्तींना आत जाऊ दिले नाही.
‘इन कॅमेरा’ तपासणी
आयकर विभागाकडून कारवाई ‘इन कॅमेरा’ केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणत्याही व्यक्तीने कारवाईत हस्तक्षेप करू नये, कोणी केल्यास ते चित्रित करण्यासाठी ही तपासणी ‘इन कॅमेरा’ करण्यात आली.
 

Web Title: Builder, businessman's dash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.