बुलबुल, सुगरण, शूबग अन् दयाळची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:03 PM2019-02-17T22:03:33+5:302019-02-17T22:03:52+5:30

ग्लोबल वातावरण आणि वाढत्या प्रदूषणाने पक्षी, वन्यजिवांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील सोसायटी फॉर वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंटच्या पुढाकाराने शनिवारी पक्षिनिरीक्षण पार पडले. यात बुलबुल, रूफर ट्रीपाय, शूबग, हरियल, कोयल, हळद्या, मोर, तितर, सुगरण, पाणकावळा अशा बऱ्याच पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

Bulbul, Shugan, Shubag and Merah | बुलबुल, सुगरण, शूबग अन् दयाळची नोंद

बुलबुल, सुगरण, शूबग अन् दयाळची नोंद

Next
ठळक मुद्देपक्षी निरीक्षणाला प्रारंभ : विद्यापीठ परिसराची परिक्रमा; तलावावर आढळले वन्यप्राण्यांचे ठसे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्लोबल वातावरण आणि वाढत्या प्रदूषणाने पक्षी, वन्यजिवांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील सोसायटी फॉर वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंटच्या पुढाकाराने शनिवारी पक्षिनिरीक्षण पार पडले. यात बुलबुल, रूफर ट्रीपाय, शूबग, हरियल, कोयल, हळद्या, मोर, तितर, सुगरण, पाणकावळा अशा बऱ्याच पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात पक्षिनिरीक्षण घेण्यात आले. यामध्ये पक्षिमित्रांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपासून पक्षिनिरीक्षणास सुरुवात करण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण चावजी, प्रमोद मराठे, श्रीमती बापट, नूपुर बापट, मनीषा चावजी, प्रकाश कुळमेथे, विवेक वेखंडे, उदय मुळे, विजय संत, सुनंदा चावजी आदींनी पक्षिनिरीक्षणात सहभाग होता. विद्यापीठाची प्रशासकीय इमारत ते तलाव परिसरापर्यंत पक्षिनिरीक्षण पार पडले. यादरम्यान दुर्मीळ पक्ष्यांची माहिती संकलित करण्यात आली.
पक्षिनिरीक्षणाची प्रक्रिया निरतंर सुरू असणार आहे. पक्ष्यांबद्दल आवड असलेल्यांनी पक्षिनिरीक्षणाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासोबत संपर्क साधावा, असे प्रवीण चावजी यांनी कळविले आहे.
सोसायटीमार्फत दर आठवड्यात पक्षिनिरीक्षण होणार असून, पुढील टप्प्यात वेगळे स्थळ निश्चित केले जाणार आहे.
वन्यप्राण्यांचा वावर बिबट्याचे दर्शन नाही
विद्यापीठ परिसरात असलेल्या तलावावर रानडुक्कर, हरिण या वन्यप्राण्यांंच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या तलाव परिसरात वन्यप्राण्यांचा वावर ही नित्याची बाब असल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र बिबट्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आले नाही. काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन झाले नाही, असे सुरक्षा रक्षकांनी पक्षी निरीक्षकांच्या चमूला सांगितले.

Web Title: Bulbul, Shugan, Shubag and Merah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.