वळू पोहोचला थेट चौथ्या मजल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:31 AM2019-08-10T01:31:38+5:302019-08-10T01:32:21+5:30

तळमजल्यातील पायऱ्यांनी वळू थेट चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पोहोचल्याने रुख्मिणी प्रभागातील गांधीनगरात खळबळ उडाली. वळूला अचानक चौथ्या मजल्यावर पाहून अचंबित झालेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

The bull reaches directly to the fourth floor | वळू पोहोचला थेट चौथ्या मजल्यावर

वळू पोहोचला थेट चौथ्या मजल्यावर

Next
ठळक मुद्देरहिवासी अवाक : गांधीनगरातील रचना समृद्धी अपार्टमेंटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तळमजल्यातील पायऱ्यांनी वळू थेट चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पोहोचल्याने रुख्मिणी प्रभागातील गांधीनगरात खळबळ उडाली. वळूला अचानक चौथ्या मजल्यावर पाहून अचंबित झालेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेर महापालिकेच्या चमुने वळूला बेशुद्ध करून सुखरुप खाली आणल्यानंतर रहिवासांचा जीव भांड्यात पडला.
गांधीनगरातील रचना समृद्धी सदनिकेतील चौथ्या मजल्यावर वळू पोहोचल्याने शुक्रवारी सकाळी खळबळ उडाली. घटनेची माहिती नगरसेविका नूतन भुजाडे यांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला दिल्यावरून पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात पथकातील पशुधन निरीक्षक गुणसागर गवई, स्वास्थ्य निरीक्षक पंकज कल्याणकर, भूषण राठोड, नीलेश सोळंके, संतोष डुलगज पोलीस पथकातील पीएसआय मनीष मानकर, पोलीस शिपाई प्रमोद देशमुख व धनशाम बुंदेले घटनास्थळी पोहोचले. वळूला पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर बेशुद्ध करून दोरीच्या साहाय्याने वळूला पायऱ्यांवरून हळूहळू तळ मजल्यावर आणण्यात आले.

भिंतीसह पाईप तोडला
रचना समृद्धी सदनिकेतील चार मजली इमारतीत १२ फ्लॅट आहेत. त्यामध्ये विविध कुटुंबे राहतात. या सदनिकेच्या तळमजल्यावर पार्किंगची जागा असून, तेथूनच थेट चौथ्या मजल्यापर्यंत पायºया आहेत. गुरुवारी रात्री तळमजल्यातील फाटक उघडे होते. वळूवर श्वान भुंकल्याने तो सदनिकेतील पार्किंगमध्ये शिरला. श्वान मागे लागल्याने पायºयांवरून वळू चवथ्या मजल्यावरील टेरेसवर पोहोचला. त्यामुळे तेथील पाण्याचे भिंत व पाईप तुटले.

Web Title: The bull reaches directly to the fourth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.